उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी अयोध्येत रामजन्मभूमी येथे संतांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी केली. यावेळी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विहिंप संरक्षक दिनेश उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
( हेही वाचा : माता न तू वैरीणी; वरळीतील पंचतारांकित हॉटेलच्या डस्टबिनमध्ये बाळाला फेकले)
500 वर्षांचा संकल्प लवकरच पूर्ण होईल
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. या पायाभरणीद्वारे 500 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली असून राम मंदिर भारताच्या एकात्मतेचे प्रतीक बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू झालेला अयोध्येतील हिंदू जनतेचा 500 वर्षांचा संकल्प लवकरच पूर्ण होईल असा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. कै. अशोक सिंघल आणि महंत रामचंद्र दास परमहंस यांच्या पुण्यवान आत्म्यांनाही आनंद वाटेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोरक्षपीठाच्या तीन पिढ्या या कामात गुंतल्या आहेत. आजचा दिवस आपल्या सर्वांना एक नवीन प्रेरणा देतो. जर आपण नेहमी सत्य आणि धर्माच्या मार्गाने पुढे गेलो तर आपल्याला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही. आपल्याला अयोध्येला जगातील सर्वात सुंदर शहर बनवायचे आहे. आंदोलनानंतर आता बांधकामाच्या कामात सहभागी व्हावे लागेल अयोध्या भव्य आणि दिव्य होण्यासाठी काम केले जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी देशभरातील 250 हून अधिक साधू-संत उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community