- ऋजुता लुकतुके
जगातील पहिली सीएनजी दुचाकी (CNG Bike) नुकतीच पुण्यातून लाँच झाली. ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत हमारा बजाज… म्हणणाऱ्या बजाज कंपनीने या बाईकची निर्मित्ती केली असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्याहस्ते या बाईकच्या लाँचिंगचा सोहळा पार पडला. ऑटोमोबाईल क्षेत्रात नव्या क्रांतीची बीज रोवणारा हा लाँचिंग सोहळा चर्चेत ठरला तो बजाज कंपनीने केलेल्या दाव्यामुळे. कारण, सीएनजीवर (CNG) धावणारी ही जगातील पहिली दुचाकी असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. आता, कंपनीकडून लाँच करण्यात आलेल्या या बाईकसाठी केंद्र सरकारने देशात सीएनजी पंपांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षाही राजीव बजाज यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. १२५ सीसीचं इंजिन असणारी ही बाईक २ किलो सीएनजी टाकीची क्षमता आहे.
Bajaj Launches World’s First CNG Bike: Freedom 125 from ₹95,000#Bajaj #BajajFreedom125 #CNGBike #NewLaunch pic.twitter.com/wrkwlqc3WB
— Smartprix (@Smartprix) July 5, 2024
(हेही वाचा – BMC महापालिकेतील अभियंत्यांवरील अतिरिक्त कार्यभाराची होणार चौकशी?)
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. तर, सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यात येत असून सध्या सीएनजी वाहनांना मोठी मागणी असून चारचाकी सीएनजी वाहनांची बाजारात चलती असल्याचं पाहायला मिळते. त्यातच, आता बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी, भारत हा वाहनउद्योग क्षेत्रात अगोदर सातव्या क्रमांकाचा देश होता, आता तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली. तसेच, या सीएनजी बाईकची किंमत १ लाखांपेक्षा कमी असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. (CNG Bike)
सीएनजी बाईकची किंमत किती?
बजाजने लाँच केलेल्या या सीएनजी बाईकची लवकरच विक्री सुरू करण्यात येणार असून सध्या लाँच झालेल्या तीन बाईक ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. या तिन्ही बाईकची किंमत अनुक्रमे ९५,०००, १,०५,००० आणि १,१०,००० रुपये इतकी आहे.
सीएनजी बाईकची वैशिष्ट्ये
– १२५ सीसी
– २ किलोची सीएनजी टाकी
– सीएनजी टाकी ही सीटच्या खाली बसविण्यात आली आहे.
– सीएनजी टाकीसाठी पेट्रोल टाकीच्या वरपर्यंत सीट
– यात २ लीटर पेट्रोल टाकीही आहे
– एकदा दोन्ही टाक्या भरलेल्या असतील तर २३० किमींचा पल्ला ही बाईक गाठू शकेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community