साडेतीन महिन्यांत CNG दरात तब्बल २२ रुपयांची वाढ!

केंद्र आणि राज्य सरकारने वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याने दुचाकी व कारचालक काहीसे सुखावले आहेत. मात्र, सीएनजी वाहन असलेल्यांना अजूनही दरवाढीचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ब्रेक घेतला असला, तरी ‘सीएनजी’च्या दरवाढीची गाडी मात्र सुसाट आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत पुण्यात ‘सीएनजी’चे दर २२.०८ रुपयांनी वाढले आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरानंतर सीएनजी महाग

एक एप्रिल रोजी शहरात सीएनजी ६२.२० रुपये प्रतिकिलो होता. आता तो ८५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. २०२० मध्ये अनलॉक सुरू झाल्यानंतर सातत्याने इंधनाचे दर वाढत होते. सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत होते. मात्र, तेव्हा ‘सीएनजी’चे दर स्थिर होते. परंतु, काही दिवसांनी सीएनजीदेखील महाग होत गेले.

(हेही वाचा – राऊतांना चौकशीला हजर राहण्यासाठी ED ने वाढवून दिली वेळ)

इतर इंधनाच्या किमती वाढत असल्याने जुलै २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान अनेकांनी त्यांचे पेट्रोलवरील वाहन सीएनजी करून घेतले. मात्र, जानेवारी २०२१ नंतर या वाहनचालकांनादेखील इंधन दरवाढीचा सामना करावा लागला. दोन जानेवारी २०२१ रोजी सीएनजी ५५.५० रुपये किलो होते. तेच डिसेंबर २०२१ पर्यंत ६३.९० रुपयांवर पोचले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here