महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळील कंटेनरमधून सुमारे 56 किलो कोकेन जप्त केले आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या कोकेनची अधिकृत किंमत सांगितली नसली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हे अंमली पदार्थ सुमारे 500 कोटी रुपयांचे असल्याची माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा: मॉन्सूनची रखडलेली वाटचाल पुढे सरकली, पाहा कुठे पोहोचले नैऋत्य मोसमी वारे )
डीआरआय टीमला 56 किलो कोकेन
मिळालेल्या माहितीच्या आधारे चमूने गुरुवारी रात्री परदेशातून मुंद्रा बंदरात आलेल्या कंटेनरचा शोध घेतला. हा कंटेनर फ्रेट स्टेशनवर ठेवण्यात आला होता, असे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. डीआरआय टीमला 56 किलो कोकेन सापडले. जे आयात केलेल्या वस्तूंमध्ये लपवले गेले होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. डीआरआयच्या पथकाने महिन्याभरापूर्वी कच्छ जिल्ह्यातील कांडला बंदराजवळील कंटेनर स्टेशनवर छाप्यादरम्यान 1 हजार 300 कोटींचे 260 किलो हेरॉईन जप्त केले होते.
Join Our WhatsApp Community