लेडीज टॉयलेटमधे जाऊ दिले नाही, म्हणून त्याने केले हे…

मैत्रीण पाठोपाठ लेडीज टॉयलेटमध्ये निघालेल्या तरुणाला रोखले म्हणून संतापलेल्या तरुणाने टॉयलेटची देखरेख करणाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून पोबारा केला. ही धक्कादायक घटना कुलाब्यातील रिगल जंक्शन या ठिकाणी घडली आहे. या हल्यात जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी अनोळखी तरुणाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अशी घडली घटना

सुरेंद्र मेहत्तर (३०) असे जखमीचे नाव आहे.कुलाब्यातील रिगल जंक्शन जवळ असणाऱ्या सुलभ शोचालयाचे साफसफाई आणि देखरेखीचे काम सुरेंद्रकडे आहे. शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक जोडपे टॉयलेटच्या बाहेर कट्ट्यावर बसले होते. काही वेळाने या जोडप्यातील तरुणी लेडीज टॉयलेटमध्ये गेली, तिच्या पाठोपाठ हा तरुण लेडीज टॉयलेटमध्ये जात असताना सुरेंद्र ने या तरुणाला हटकले आणि त्याला लेडीज टॉयलेटमधे जाण्यास मज्जाव केला. लेडीज टॉयलेटमधे जाऊ दिले नाही या रागातून या तरुणाने स्वतःजवळील चाकू काढून सुरेंद्रच्या पोटात, पाठीवर वार करून पळ काढला.

(हेही वाचा – प्रत्येक सहापैकी एका भारतीयाला मधुमेह)

जखमी झालेल्या सुरेंद्र तेथे जमलेल्या जमावाने रुग्णालयात दाखल करून पोलिसांना कळवले. कुलाबा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी सुरेंद्रचा जबाब नोंदवून अनोळखी तरुणाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here