पुण्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत थंडी कायम; गेल्या तीन वर्षांतील निचांकी तापमानाची नोंद

126

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन थंडी अवतरली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत तापमानातील ही घट कायम राहणार आहे. शहरात सध्या गेल्या तीन वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे.

(हेही वाचा- हातात वॉश बेसिन घेऊन एलन मस्क थेट ट्विटरच्या ऑफिसात! Video व्हायरल)

पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातून २३ ऑक्टोबरला मोसमी पाऊस माघारी गेला. यंदा शहराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. १ ऑक्टोबरपासून शहरात सुमारे ३५० मिलिमीटर आणि सरासरीपेक्षा तब्बल २०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली. शहरात पावसाळी वातावरण असताना २२ ऑक्टोबरपर्यंत किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या वर नोंदविले जात होते. मात्र, पाऊस परतल्यानंतर आकाशाची स्थिती निरभ्र झाली आणि शहराच्या तापमानात एकदमच ६ अंशांनी घट होऊन ते १५.८ अंशावर गेले. त्यामुळे दिवाळीत शहरांमध्ये थंडीची चाहूल लागली. त्यानंतर तापमानातील घट कायम राहिली आहे.

२४ ऑक्टोबर रोजी १४.४ अंश सेल्सिअस, २५ ऑक्टोबर रोजी यंदाच्या हंगामातील निचांकी १३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर २६ ऑक्टोबर रोजी पुण्यात १४.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजा नुसार, गेल्या तीन दिवसांतील हे तापमान गेल्या तीन वर्षांमधील नीचांकी तापमान ठरले. पुढील चार ते पाच दिवस याच पातळीवर तापमानाचा पारा राहणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.