कॅनडाच्या सीमेवर थंडीमुळे गारठून ४ भारतीयांचा मृत्यू

156

अमेरिकेच्या जवळ असणा-या कॅनडाच्या सीमेवर चार भारतीयांचे मृतदेह आढळून आले आहेत. अति थंडीमुळे गारठून त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतांमध्ये दोन प्रौढ व्यक्ती, एक किशोरवयीन व्यक्ती आणि एका नवजात शिशूचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे अमेरिकेच्या सीमेतून आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र खराब वातावरणामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तेथील परिसरात तापमान उणे ३५ अंश सेल्सियस इतके आहे. याप्रकरणी अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे. नक्की त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध सुरू करण्यात आला आहे. कॅनडा-अमेरिका सीमेवर एका अर्भकासह 4 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अहवालामुळे धक्का बसला आहे. या प्रकरणी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी अमेरिका आणि कॅनडा सरकारकडून तात्काळ अहवाल मागवला आहे.

(हेही वाचा – ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे निधन, वाचा कारकीर्द आणि प्रवास )

पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, हे चौघेही सीमेजवळच्या अमेरिकेच्या भागातून पकडण्यात आलेल्या एक गटातले होते. चारही मृतदेह सीमेपासून ९ ते १२ मीटरच्या अंतरावर आढळून आले आहे. अमेरिकी सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एमर्सन परिसरातून एक गट सीमा ओलांडून अमेरिकेत दाखल झाला आहे. एका प्रौढ व्यक्तीकडे लहान मुलाच्या काही वस्तू आहेत, मात्र या गटात कोणताही नवजात शिशू नाही. यानंतर लगेचच सीमेच्या दोन्ही बाजूंना सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि दुपारी दोन प्रौढ व्यक्ती आणि एका नवजात शिशूचा मृतदेह आढळून आला. किशोरवयीन व्यक्तीचा मृतदेह मात्र काही वेळानंतर आढळला आहे. मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्लोरिडाच्या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.