राज्यात पुढल्या वर्षी सुरु होणार अ‍ॅक्युपंक्चर थेअरपीची महाविद्यालये

113

औषधांविना विविध आजारांवर मात करण्यासाठी जगभरात वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅक्युपंक्चर थेअरपीला आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे. राज्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य अ‍ॅक्युपंक्चर परिषदेच्यावतीने वैद्यकीय अ‍ॅक्युपंक्चर थेअरपीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालये पुढल्या वर्षापर्यंत सुरु होतील, असा मानस परिषदेचे अध्यक्ष डॉ. रुमी बेहरामजी यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा : Google Pay हे अ‍ॅप ओपन न करताच पूर्ण होईल तुमचे पेमेंट; काय आहे हे नवे फिचर)

अ‍ॅक्युपंक्चर थेअरपी महाविद्यालये सुरू होणार 

दुखणे, आजार यांवर कमी खर्चात अ‍ॅक्युपंक्चर थेअरपीने उपचार दिला जातो. मात्र या व्यवसायाला सन्मानपूर्वक ओळख मिळावी, यासाठी २०१७ साली महाराष्ट्र राज्य अ‍ॅक्युपंक्चर थेअरपीची स्थापना झाली. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून परिषदेच्यावतीने राज्यातील विविध अ‍ॅक्युपंक्चर थेअरपीस्टला शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देत त्यांची परिक्षा घेतली गेली. सध्या अ‍ॅक्युपंक्चर थेअरपीस्टच्या अर्ज पडताळणीचे काम सुरु असल्याची माहिती डॉ. रुमी बेहरामजी यांनी दिली. लवकरच पालिका आणि सरकारी रुग्णालयांत नोंदणीकृत अ‍ॅक्युपंक्चर थेअरपीस्टकडून बाह्य रुग्ण सेवा सुरु करण्याचा डॉ. बेहरामजी यांचा मानस आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.