पुन्हा एकदा कोलंबियात भूस्खलन; ३३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

88

कोलंबियात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने तब्बल ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना कोलंबियांची राजधानी असलेल्या बोगोटापासून २३० किलोमीटर अंतरावर घडली आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले.

कोलंबियात भूस्खलन झालेल्या परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ढिगा-यातून बाहेर काढलेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – आमदारांचा जीव टांगणीला; मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्रीय नेतृत्त्वाकडून लाल सिग्नल?)

कोलंबियातून पुन्हा एकदा भूस्खलनाची बातमी आली आहे. येथे दरड कोसळून रस्ता खचला आहे. कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले, प्यूबेलो रिको आणि सैंटा सिसिलिया या गावांदरम्यान बसला धडक दिली. राजधानी बोगोटापासून 230 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. या बसमध्ये जवळपास 25 प्रवासी होते. बसमधून पाच जणांना जिवंत काढण्यात आले होते. भूस्खलनात अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथके बसमधून प्रवास करणाऱ्या लोकांचा शोध घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.