हेरिटेज कमिटीच्या परवानगीशिवाय २५० बांधकामे तोडण्यास आयुक्तांची मुभा, शेलार म्हणतात विकासकांना ७० हजार कोटींचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न

178

मुंबई महानगर पालिकेच्या घोटाळयांची मालिका वाढत असून ऐकावे ते नवलच या पध्दतीने घोटाळयांची प्रकरणे रोज समोर येत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आहे. आता नविन घोटाळा समोर आला आहे ज्यामध्ये मुंबई शहरातील राज्य सरकार नियुक्त हेरिटेज कमिटी अस्तित्वात असताना सुध्दा हेरिटेज श्रेणी ३ मधील वास्तू या हेरिटेज कमिटीच्या परवानगीविना मुंबई महापालिका आयुक्तांनी परस्पर तोडण्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबईत श्रेणी ३मध्ये २५० इमारती आणि स्ट्रक्चर आणि १३ परिसरांमध्ये तोडकाम करण्याची परवानगी आयुक्तीन परस्पर दिली असून ही कुणाच्या सांगण्यावरुन दिली? यातून बिल्डरांना ७० हजार कोटींचा फायदा करुन देण्यात येत असून ऐतिहासिक वास्तू तोडून बिल्डरच्या घशात ऐतिहासिक वास्तू आणि जागा घातल्या जात असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

( हेही वाचा : मालवण बोट दुर्घटना : शिवसेना आमदाराच्या पुतण्याचा मृत्यू)

शेलारांचा आरोप

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शहरातील ऐतिहासिक वारसा वास्तूंमध्ये मोडणाऱ्या श्रेणी तीनमधील इमारतींच्या बांधकामाबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. याबाबत भाजपचे ऍड.आशिष शेलार यांनी प्रशासनासह राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टिका केली आहे. मुंबई शहरामध्ये ऐतिहासिक वारसा असलेली जागा, स्थळे, आणि इमारती आहेत. यातील काही ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती पुरातत्व विभागाकडून संरक्षीत केली जातात कारण या ऐतहासिक वास्तुंमुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडते. जगभरात हेरिटेज स्ट्रक्चर वाचविण्यासाठी प्रयत्न होत असताना शिवसेनेच्या ताब्यातील ही स्ट्रक्चर तोडण्याच्या परवानग्या बिल्डरांना जलदगतीने दिल्या जात आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असणा-या या वास्तू तोडण्याची परवागनी दिली जातेय याकडे पर्यटन मंत्र्यांचे लक्ष आहे का? मुंबई आमचीच असा कांगावा करणारे आता या विरोधात का बोलत नाहीत असा सवाल शेलार यांनी करत यातून बिल्डरांना ७० हजार कोटींचा फायदा करुन देण्यात येत असून ऐतिहासिक वास्तू तोडून बिल्डरच्या घशात ऐतिहासिक वास्तू आणि जागा घातल्या जात आहेत, असा आरोप केला.

मुंबईच्या सौंदर्यात भर घालणा-या वास्तूंच्या संरक्षणासाठी आम्ही न्यायालयात जाऊ

या सगळया प्रकरणात आयुक्त कुणाच्या तरी सांगण्यावरुन ही परवानगी देत असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे,अशी विनंती शेलार यांनी केली आहे. खाई त्याला खवखवे.. .‍ शिवसेनेचे माजी नगरसेवक व युवा सेनेच्या एका पदाधिका नेत्याच्या जवळचे असलेल्या अमेय घोले नामक नगरसेवकांना हेरिटेज कमिटी परवानग्या देत नाही म्हणून हेरिटेज कमिटीच बरखास्त करा, अशी मागणी केली होती.

याची आठवण करून देत शेलार यांनी हे महाभंयकर असल्याचे म्हटले आहे. या विषयात मुख्यमंत्र्यांना विनंती करत त्यांनी, आयुक्तांना कायद्याची आठवण करुन देतोयश, अन्यथा मुंबईच्या सौंदर्यात भर घालणा-या वास्तूंच्या संरक्षणासाठी आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला.

वांद्रे बॅडस्टँन्ड येथील सरकारी भूखंडावर असणारे असेच ऐतिहासिक स्ट्रक्चर तोडण्याची परवानगी आयुक्तांनी दिली याचे प्रकरण त्यांनी नुकतेच उघड केले आहे. हेरिटेज कमिटी याबाबत स्वत: आयुक्तांनी लिहून कळवते आहे की, एवढी प्रकरणे आमच्या परवानगी शिवाय मंजूर कशी होत आहेत?. असा सवाल कमिटीच करते आहे. या कमिटीमधील तज्ञ स्वत: सांगत आहेत की आम्हाला बाजूला ठेवून हे निर्णय घेतले जात आहेत तरीही पालिका आयुक्त ऐकायला तयार नाहीत,असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.