गूगलला भारताने ठोठावला 1 हजार 337 कोटींचा दंड; ‘हे’ आहे कारण

154

भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने सर्च इंजिनमधील प्रसिद्ध नाव असलेली कंपनी गुगलला दणका दिला आहे. गुगलकडून आयोगाने तब्बल 1 हजार 337 कोटी रुपयांचे दंड ठोठावला आहे. बाजारात असलेल्या आपल्या स्थानाचा चुकीचा वापर गुगलने केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एड्राॅई़ड मोबाईल डिव्हाइस इकोसिस्टमच्या क्षेत्रात गुगलने असलेल्या आपल्या स्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय सीसीआय अर्थात भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने गुगलला आपली गैरवर्तणूक सुधारावी, असा सल्ला दिला आहे. मर्यादित वेळेत गुगलने आपली चूक सुधारावी, असे निर्देश गुगलला आयोगाकडून देण्यात आले आहेत.

दिलेल्या वेळेत चूक सुधारावी

भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. नाॅन ओएस वेब स्पेसिफिक वेब ब्राउजर मार्केटमध्ये आपला दबदबा वाढवण्यासाठी गुगलने एॅप स्टोर मार्केटमध्ये आपल्या सद्यस्थितीचा गैरवापर केल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्याच कारणामुळे गुगलवर ही कारवाई करण्यात आली आहे. आता गुगलला एक मर्यादित वेळ आखून देण्यात आली आहे. या वेळेत त्यांना केलेली चूक सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. शिवाय 1 हजार 337.76 कोटी रुपयांचा आर्थिक दंडही गुगलकडून आकारला जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा: Nirav Modi Property seize: नीरव मोदीच्या 39 मालमत्ता जप्त होणार; ‘या’ मालमत्तांचा समावेश )

अहवाल पोलीस महासंचालकांकडे सोपावणार

याआधीही गुगलच्या विरोधात चौकशीचे आदेश काढण्यात आले होते. याच महिन्यात गुगलविरोधात चौकशी आदेश देण्यात आले होते. भारतीय प्रसिस्पर्धा आयोगाने 8 ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात चौकशी अहवाल देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. हा अहवाल पोलीस महासंचालकांना देण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.