सायबर क्राईमविरोधात Online तक्रार करायची आहे? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

159

सध्या सर्वत्र डिजिटलायझेशन झाल्याने सर्वच जण ऑनलाइन व्यवहार करणं पसंत करतात. त्याचवेळी सायबर भामट्यांचा सुळसुळाट झाला असून फसवणुकीच्या घटनांमध्येही सतत वाढ होताना पाहायला मिळत आहे. हे रोखण्यासाठी सायबर क्राइमची तक्रार ऑनलाइन करता येते. याने बँकिंग फसवणूक आणि सायबर बुलिंगमुळे होणारे नुकसान टाळता येणं शक्य आहे. तुम्हाला देखील सायबर क्राईमविरोधात Online तक्रार करायची आहे? जाणून घ्या सायबर क्राइमची ऑनलाइन तक्रार कशी नोंदवायची…

(हेही वाचा – भारतातील चिनी शेल कंपन्यांवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची कारवाई, SFIO कडून मास्टरमाईंडला अटक)

या आहेत सोप्या स्टेप्स

  • सायबर क्राइमची ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ब्राउझरवर जावे लागेल.
  • त्यानंतर www.cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट देऊन येथे ‘फाइल अ कम्प्लेन’ हा पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला एक विंडो दिसेल, ज्यामध्ये राज्य, मोबाइल नंबर टाकून लॉगइन करावे लागेल. मोबाइलवर मिळालेला ओटीपी टाकून त्यानंतर ही माहिती सबमिट करा.
  • त्यानंतर घटना काय आहे त्यानुसार त्या कॉलमवर जा. तुमची समस्या नोंद करा आणि विचारलेली माहिती भरा. यानंतर तुम्हाला सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट बटणावर क्लिक करावे लागणार आहे.
  • यानंतर, ज्याबाबत शंका आहे, एखाद्याचा व्यक्तीचा तुम्हाला संशय आहे किंवा धोका वाटत असेल त्याबाबत माहिती द्या. नंतर तक्रार तपशील पर्यायामध्ये तुमचा ई-मेल आयडी आणि फोटो सबमिट केल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात येईल.
  • व्हेरिफिकेशन झाल्यावर कन्फर्म बटणावर क्लिक करून सबमिट करा.
  • सबमिट केल्यानंतर युजर्स तक्रारीची प्रत पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकतो. यानंतर युजर्सला त्याच्या तक्रारीला ट्रॅक करता येईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.