आता शत्रुघ्न सिन्हांचे कुटूंब अडचणीत! कारण काय?

102

जमिनीच्या मालकाचा मृत्यू झाल्यावरही तो जिवंत असल्याचे दाखवून पुणे जिल्ह्यातील मौजे वाघोली येथील जमीन (गट क्रमांक १३३१/१ क्षेत्र १ हेक्टर आणि ५५ आर) नावावर करून जागा बळकावल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा, पुत्र कुश सिन्हा यांच्याविरोधात सक्त वसुली संचालनालय (ईडी) तसेच पुणे पोलीस उपायुक्त परीमंडळात, जमिनीचे मालक संदीप दाभाडे यांनी पुराव्यांसह तक्रार केली आहे .

तक्रार दाखल

संदीप दाभाडे यांनी रविवारी ईमेलद्वारे बंडगार्डन पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ही तक्रार पाठवली. स्वतः बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानकर यांनी रविवारी सायंकाळी ही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने सोमवारी सकाळी दाभाडे यांनी पुण्यातील पोलीस उपायुक्त परिमंडळ येथील अधिकारी पाटील, सहायक पोलीस आयुक्त, कँट उपविभाग, अधिकारी गवारी यांची भेट घेतली, तक्रार दाखल केली. याचप्रमाणे सर्व कागदोपत्री पुराव्यासह सक्तवसुली संचालनालय (ईडी) येथे ईमेल द्वारे तक्रार दिली.

( हेही वाचा : अरे व्वा! चक्क लोकलमध्ये मिळणार वायफाय )

गैरव्यवहाराने जमीन नावावर

संदीप दाभाडे यांची वडिलोपार्जित जमिनीचे कुलमुखत्यार पत्र त्यांचे पिता गोरखनाथ दाभाडे यांनी पूनम शत्रुघ्न सिन्हा व कुश सिन्हा यांना २००२ व २००४ मध्ये दिले होते. गोरख दाभाडे सन २००७ साली मृत झाल्यावर ते कुलमुखत्यार पत्र कायदेशीररित्या गैरलागू ठरत होते. आणि संदीप दाभाडे आणि त्यांचे भाऊ-बहिण हे वडिलोपार्जित संपत्तीचे आधीच मालक होते. परवानगी न घेता व गोरखनाथ दाभाडे मृत झाल्यानंतरदेखील ते जिवंत असल्याचे घोषणापत्र आणि प्रतिज्ञापत्र सन २००९-२०१० मध्ये तयार करून, त्याचा उपयोग करून सौ. पूनम शत्रुघ्न सिन्हा व कुश सिन्हा यांनी स्वतःचे व साथीदारांचे नावे त्या जमिनीचे विक्रीपत्र नोंदवले. ७/१२ वर फेरफार करतांना महसूल विभागाने त्याच्या नोटीसा दाभाडे कुटुंबियांना दिल्या नाहीत व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून, राजकीय लागेबांधे वापरून सौ. पूनम शत्रुघ्न सिन्हा, कुश सिन्हा व त्यांच्या साथीदारांनी स्वतःच्या नावे करून घेतली.

सन २००९ मध्ये गोरखनाथ दाभाडे हे मृत झाले असतानाही त्याचे नावाने अर्ज करून उप विभागीय अधिकारी पुणे यांच्या कार्यालायातून शेती खरेदीची परवानगी गैरप्रकारे मिळविली. याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रारी देऊन उपयोग झाला नाही, असे संदीप दाभाडे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.