तुम्ही कित्येकदा भारतीय रल्वेने प्रवास केला असेल, इतकेच नाही तर प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा तो एक भाग आहे. प्रवासादरम्यान सर्वजण स्वत:साठी जेवण ऑर्डर करता. परंतु, अनेक वेळा भरमसाठ पैसे देऊनही प्रवाशांना रेल्वेत हवे तसे दर्जेदार जेवण मिळत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या जेवणात अळ्या दिसल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. त्यामुळे हे जेवण मागवताना प्रवाशांना चिंता वाटत होती. अशा स्थितीत प्रवाशांची निराशा देखील झाली. यासंदर्भातील तक्रारींबाबत रेल्वेने गंभीरपणे निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी रेल्वेचं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, या तक्रारी लक्षात घेता आता भारतीय रेल्वे आणि IRCTC यांनी मिळून एक विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ट्रेनमधील अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी अन्न सुरक्षा पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. रेल्वे जेवणाची चव आणि दर्जा या दोन्हीबाबत खूप गंभीर आहे. पर्यवेक्षक केवळ स्वयंपाकाची प्रक्रियाच तपासणार नाहीत, तर ते पदार्थांशी संबंधित तेल, तूप, मसाले इत्यादी गोष्टीही तपासतील. या पर्यवेक्षकाची नियुक्ती ऑनलाइन बोलीद्वारे (ई-बिड) केली जाणार आहे. IRCTC त्याच्या बेस किचनमध्ये या पर्यवेक्षकाची नियुक्ती करणार आहेत.
(हेही वाचा – शिवसेनेच्या ‘या’ उपनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल!)
जेवणाद्वारे रेल्वेला होते कमाई
रेल्वेच्या कमाईचा मोठा हिस्सा प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणातून येतो. देशातील 70 टक्के गाड्यांमध्ये प्रवाशांना जेवण दिले जाते. तर सध्याच्या परिस्थितीत रेल्वेच्या कमाईपैकी 20 टक्के रक्कम प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणातून येते. कोरोनापूर्वी रेल्वेच्या कमाईपैकी 45 टक्के कमाई रेल्वेच्या जेवणातून होत होती. कोरोना महामारीनंतर या जेवणातून मिळणाऱ्या कमाईत मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता जेवणाचा दर्जा वाढवून प्रवाशांना आरोग्यदायी आणि चविष्ट जेवण देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
Join Our WhatsApp Community