अखेर २२ जानेवारीची राममय पहाट उजाडली ! देश-विदेशातील रामभक्त ज्या सोहळ्याची वाट पहात होते, तो सोहळा आज संपन्न होणार आहे. त्यासाठीची सिद्धता पूर्ण झाली आहे. देश-विदेशातील मान्यवर अयोध्येत दाखल झाले आहेत. (Ayodhya Rammandir)
(हेही वाचा – SBI Report: राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला चालना, उत्तर प्रदेश सरकारला होणार किती कमाई; वाचा सविस्तर)
१२ वाजून २० मिनिटांनी मुख्य सोहळा सुरु होणार
अयोध्यानगरीमध्ये ठिकठिकाणी करण्यात आलेली नेत्रदीपक सजावट, रोषणाई यातून या सोहळ्याचा आनंद दिसून येत आहे. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा मुख्य सोहळा सुरू होईल आणि सुमारे ४० मिनिटे चालेल. प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचे भाषण होणार आहे.
संपूर्ण देशभरात रामभक्तीचे वातावरण तयार झाले आहे. अनेक शहरांमध्ये मिरवणुका काढण्यात येत आहेत. देशभरातील विविध मंदिरांमध्येही यज्ञ-याग आणि विविध सोहळे आयोजित करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Ram Mandir Pranpratistha: राम मंदिर निर्मितीचा ‘अनोखा’ आनंदोत्सव!)
थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून कोट्यवधी भाविक सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध क्षेत्रांतील शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. ऑनलाइन माध्यमांतून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
जय सियाराम!
प्रभु श्री राम और माता सीता के चरण रज से पावन हुई धरा श्री अयोध्या धाम में, ‘नए भारत’ में सांस्कृतिक पुनर्जागरण के शिल्पी, देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री @narendramodi जी का हार्दिक स्वागत एवं अभिनंदन!
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 22, 2024
योगी आदित्यनाथ यांनी केले स्वागत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या (ram mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आहे. ‘नवीन भारतातील सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे शिल्पकार, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रभु श्रीराम आणि माता सीतेच्या चरणांनी प्रतिष्ठापित केलेल्या श्री अयोध्या धाम येथे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन !’, असे योगी आदित्यनाथ यांनी लिहिले आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संत-महंत यांचेही स्वागत केले आहे. ‘तुमची सन्माननीय उपस्थिती ‘राम राज्य’ बद्दलची आमची बांधिलकी आणखी मजबूत करेल’, अशा शब्दांत योगीजींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community