अजानच्या आवाजाने एकाग्रता जाते, गोव्यात मशिदीच्या भोंग्याचा आवाज न्यायालयाने दाबला!

फोंडा येथील जिल्हा अतिरिक्त न्यायालयाने स्थानिक मशिदींवरील भोंग्यावर आक्षेप घेतला असून मशिदीच्या विश्वस्तांना ध्वनी प्रदूषणाच्या कायद्याचे उल्लंघन न करण्याचा आदेश दिला.  

गोव्यात एका तरुणाने वर्क फ्रॉम होम करत असताना परिसरातील मशिदीवरील भोंग्यामधून मोठ्या आवाजात अजान ऐकू येते, ज्यामुळे एकाग्रता नष्ट होते, त्यामुळे त्याने थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे धाव घेतली. न्यायालयाने हे प्रकरण जिल्हा न्यायालयात वर्ग केले. न्यायालयाने त्यावर संबंधित मशिदीच्या विश्वस्तांना ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळा, अन्यथा भोंगे बंद करा, असा दम भरला.

डिसेंबर २०२० मध्ये उच्च न्यायालयात केली होती याचिका! 

गोवा-फोंडा येथे राहणारा वरून प्रीलोकर हा तरुण लॉकडाऊन असल्याने वर्क फ्रॉम होम करत आहे. हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. त्याने उच्च न्यायालयात ध्वनी प्रदूषण कायदा २००० च्या अंतर्गत याचिका दाखल केली. ज्यामध्ये त्याने म्हटले कि, परिसरातील मशिदींमध्ये दिवसातून पाच वेळा अजान म्हटले जाते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात ध्वनी निर्मिती होते. त्यातून माझी एकाग्रता नष्ट होते. त्यामुळे या प्रकरणी कोर्टाने संबंधित मशिदीच्या विश्वस्तांना ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत असल्याप्रकरणी योग्य तो आदेश द्यावा, अशी मागणी केली.

(हेही वाचा : कोरोनाबाधित असूनही चित्रीकरण करणा-या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल!)

कुणाच्या विरोधात केली तक्रार? 

  • अध्यक्ष, नूरानी मस्जिद, फोंडा, गोवा
  • सफा मस्जिद, केटीसी बस स्टॅन्ड, फोंडा, गोवा
  • सुन्नी शिया मदिना मस्जिद, पणजी-बेळगाव बायपास रोड, गोवा
  • पंडितवाडा मस्जिद, गोवा.

काय म्हटले अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने? 

वरूण प्रीलोकर यांनी उच्च न्यायालयात जी याचिका १२ डिसेंबर २०२० रोजी दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने अतिरिक्त जिल्हा न्यायालयाकडे हे प्रकरण पाठवले असून ते ३ महिन्यांत निकाली काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही सर्व बाजू ऐकून घेतली आहे. संबंधितांची परवानगी न घेता कुणीही ध्वनी निर्मिती करणारी यंत्रणा लावू शकत नाही. जर मशिदींच्या विश्वस्तांनी परवानगी घेतली असेल, तर त्यांनी ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी मशिदीच्या विश्वस्तांनी भोंग्याचा आवाज १० डेसिबल ठेवावा, अन्यथा भोंगे बंद करावेत, फोंडा पोलिसांनी या कायद्याचे उल्लंघन होत नाही ना यावर लक्ष द्यावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here