MSRTC: सवलतधारकांची ‘लालपरी’कडे पाठ! तब्बल १,३०० कोटींचे नुकसान

143

गावखेड्यांपासून ते शहरांपर्यंत सर्वज जण एसटी बसवर अवलंबून असतो. दरम्यान, एसटी महामंडळांकडून ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती दिल्या जातात. एसटी बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजनेत ४५ ते १०० टक्के भाडे सवलत दिली जाते. मात्र सवलतधारकांमध्ये यंदा घट झाल्याचे समोर आले आहे. लाभार्थी संख्या ७. ७३ कोटी झाली, तर उत्पन्न ३८९ कोटी झाले आहे. वाढलेल्या भाडेदरानुसार हे उत्पन्न १७०० कोटी असायला हवे होते, मात्र १ हजार ३११ कोटींचा फटका बसला आहे, अशी माहिती एसटीच्या एका अधिकाऱ्यानी दिली.

(हेही वाचा – आता नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस CoWin ॲपवर उपलब्ध)

एसटीची प्रवासी वाहतूक सेवा पूर्णक्षमतेने सुरू असूनही प्रवाशांनी लालपरीकजे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीमुळे कंबरडे मोडलेला एसटी महामंडळाचा गाडा, यासह साडेपाच महिने कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एसटीचा प्रवासी वर्ग दुरावला गेला आहे. इतकेच नव्हे तर भाडे सवलत असणाऱ्या प्रवाशांनीही एसटीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

कोणत्या प्रवाशांना मिळते भाड्यात सवलत

ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील विविध घटकांना एसटी महामंडळाकडून प्रवासभाड्यात सवलत देण्यात येते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, डायलिसिस रुग्ण, अपंग, सर्वसाधारण प्रवासी, विविध सेवा पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा या लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.