पंजाबमध्ये शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थक भिडले; दगडफेक, गोळीबार अन् तलवारीही नाचवल्या

पंजाबच्या पटियाला शहरात शुक्रवारी शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये संघर्ष पेटला. शिवसेनेने खलिस्तानांच्या विरोधात मोर्चा काढला असता स्थानिक तरुणांनी शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पटियाला शहरातील काली माता मंदिरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. हिंदू आणि शीख संघटनांमध्ये दगडफेकीच्या घटनाही घडल्या. घटनास्थळी नियंत्रण मिळवण्यासाठी एसएसपी पोहोचले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला. या दरम्यान हिंदू नेता आणि त्रिपदीचे एसएचओ कर्मवीर सिंग जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

(हेही वाचा – “…हे बघून हसावं की रडावं”, निलेश राणेंचा ‘मविआ’वर हल्लाबोल)

शिवसेना कधीही खलिस्तान होऊ देणार नाही

यासंदर्भात शिवसेनेचे हरिश सिंगला म्हणाले की, शिवसेना कधीही पंजाबमध्ये खलिस्तान होऊ देणार नाही आणि कोणाला खलिस्तानीचं नावही घेऊ देणार नाही. सिख फॉर जस्टिसचे कन्वीनर गुरपतवंत पन्नू यांनी 29 एप्रिल रोजी खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही 29 एप्रिललाच खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते.

शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये दगडफेक

या मोर्चाबद्दल माहिती मिळताच खलिस्तानी समर्थक मोठ्या प्रमाणावर तिथे गोळा झाले होते. या मोर्चात शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. पटियाला शहरातील काली माता मंदीर परिसरात शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये दगडफेक झाली. या सगळ्या गोंधळामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. खलिस्तानी समर्थकांनी तलवारीने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना 15 वेळा हवेत गोळीबार करावा लागला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here