रत्नागिरी, चिपळूण बस स्थानकांसाठी शेतकरी-कष्टकऱ्यांचे आंदोलन

चिपळूण आणि रत्नागिरीतील बसस्थानकांची कामे गेली चार वर्षे रखडली आहेत. त्याविरुद्धचे १२ जून रोजी काँग्रेस आक्रमक झाले असून हे आंदोलन करण्यावर काँग्रेससह शेतकरी- कष्टकरी संघटना देखील ठाम आहे.

एस.टी. अधिकाऱ्याच्या विनंतीनंतर आंदोलक ठाम

मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानकांची कामे रखडल्याने सध्याचा ठेका रद्द करून दुसरा ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्याला वर्क आर्डरही दिली जाईल, त्यामुळे आंदोलन करू नये, अशी विनंती एस. टी. अधिकाऱ्यानी केली. ती संघटनेने धुडकाऊन लावली. बसस्थानकांसाठी असणाऱ्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून तुम्हाला जी माहिती द्यायची आहे, ती आंदोलनाच्यावेळी येऊन द्या, असे सुनावण्यात आले.

(हेही वाचा – World Oldest Tree: जगातील सर्वात जुनं झाड कोणतंय माहितीये का? वय ऐकून व्हाल थक्क!)

वारंवार मागणी करून कामे जैसे थे 

निधी नाही, कधी कामगार नाही तर कधी ठेकेदार काम करत नाही, अशी उत्तरे देऊन एस.टी प्रशासनाकडून केवळ वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे. त्याचा त्रास गोरगरीब, सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. वारंवार मागण्या करूनही ही कामे जैसे थे अवस्थेत आहेत. त्यामुळे त्या रखडलेल्या कामांकडे एसटी महामंडळ, प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस व शेतकरी-कष्टकरी संघटनेतर्फे १२ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चिपळूण बसस्थानकात धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here