‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर अखेर मागितली माफी!

117

बलात्कारासंदर्भात वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे आमदार के.आर. रमेशकुमार यांनी  ट्विटरवर माफी मागितली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांशी बोलताना “बलात्कार थांबवू शकत नसाल तर मजा करा” अशा प्रकारचे विधान केल्यामुळे या काँग्रेस आमदारांवर देशभर टीकेची झोड उठली आहे.

वादग्रस्त टिप्पणी 

राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसान याविषयी बोलण्यासाठी गुरुवारी काँग्रेस नेते वेळ मागत होते. मात्र, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी वेळ देण्यास टाळण्याचा प्रयत्न करत होते. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे आमदार रमेश कुमार यांनी सांगितले की, ‘एक म्हण आहे की जेव्हा बलात्कार टाळता येत नसेल तेव्हा झोपा आणि मजा करा. तुम्ही अगदी त्याच स्थितीत आहात.’ दरम्यान, दुर्दैवी गोष्ट म्हणजे रमेश कुमार यांच्या या असभ्य वक्तव्यावर सभागृहात उपस्थित नेते काहीच प्रतिक्रिया देताना दिसले नाही. कुमार यांनी यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष असताना अशी वादग्रस्त टिप्पणी केली होती.

( हेही वाचा : ‘जर बलात्कार थांबवू शकत नसाल, तर झोपा आणि…’; काँग्रेसच्या नेत्याचं धक्कादायक विधान )

माफी मागितली

कुमार यांनी यापूर्वी २०१८-१९ मध्येही विधानसभेचे अध्यक्ष असताना अशी टिप्पणी केली होती. यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात होती. दरम्यान, आजच्या विधानसभेत “बलात्कार” बद्दल केलेल्या निष्काळजी टिप्पणीबद्दल मी सर्वांची मनापासून माफी मागतो! माझा हेतू या गुन्ह्याला क्षुल्लक बनवण्याचा किंवा त्यावर प्रकाश टाकण्याचा नव्हता, मी यापुढे माझे शब्द काळजीपूर्वक निवडेन! असे ट्विट करत काँग्रेसचे आमदार के.आर. रमेशकुमार यांनी माफी मागितली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.