काँग्रेसचा खोडसाळपणा! वीर सावरकरांचा पुन्हा केला अवमान! 

काँग्रेसने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून वीर सावरकर यांचा अत्यंत हीन पातळीवर जाऊन अपमान केला आहे. त्यांचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. 

स्वातंत्र्य चळवळीतील हजारो सशस्त्र क्रांतीकारकांचे प्रेरणास्रोत ठरलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कीर्ती काँग्रेसच्या कायम डोळ्यांत खुपत आली आहे. तब्बल ७ दशके काँग्रेसने वीर सावरकर यांच्यावर कायम खोटेनाटे आरोप करून बदनामी केली. सत्तेचा गैरवापर करून वीर सावरकर यांचा पराक्रमी इतिहास पुसून टाकण्याचे षडयंत्र रचले, मात्र यात काँग्रेसला अपयश आले. तरीही काँग्रेसचा हा खोडसाळपणा सुरूच आहे. आता काँग्रेसने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून वीर सावरकर यांचा अत्यंत हीन पातळीवर जाऊन अपमान केला आहे. त्यांचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत.

रणजीत सावरकर यांचा हल्लाबोल

याप्रकरणी वीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी या प्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर हल्लाबोल करत जशास तसे उत्तर दिले. ‘आज काँग्रेसने पुन्हा वीर सावरकर यांचा अवमान केला आहे. हे तर गटारात लिप्त होणारे किडे आहेत. जे दुसऱ्यांवर चिखल फेकत असतात. आणि हे गटार देखील त्यांच्याच आजोबाची देणगी आहे, ज्यांनी गोरी चामडीसाठी देश विकला’, असा शब्दांत रणजीत सावरकर यांनी टीका केली आहे.

(हेही वाचा : आजादी का अमृत महोत्सव : केंद्राच्या ‘या’ खात्याकडून वीर सावरकरांचा सन्मान!)

वीर सावरकर यांच्या कथित माफीनाम्यावरून बदनामी!

एका मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये काही कारण नसताना पुन्हा एकदा वीर सावरकर यांच्या कथित माफीनाम्याचा विषय काढून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये वीर सावरकर यांचा फोटो वापरण्यात आला आहे. बॅकग्राऊंडला जस्टिन बीबर या प्रसिद्धी इंग्रजी पॉप गायकाच्या ‘सॉरी’ या गाण्याचे बोल वाजत आहेत. या व्हिडिओच्या सुरूवातीलाच इंग्रजीमध्ये ‘इंग्लंडच्या राजाला उद्देशून..’ असे शब्द लिहून येतात आणि मग पुढे संपूर्ण गाणे वाजते. काँग्रेसच्या इंस्टाग्राममधील अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ प्रसारित होत आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसने अथक प्रयत्न करूनही वीर सावरकर यांची लोकप्रियता कमी होत नाही आणि स्वातंत्र्यापासून आजपर्यंत वीर सावरकर यांच्या पराक्रमाला जाणीवपूर्वक सन्मानापासून दूर ठेवण्यात यश मिळवले, आज मोदी सरकारच्या काळात मात्र ते शक्य होत नाही, त्यामुळे काँग्रेसचा आता तिळपापड होऊ लागला आहे. त्यातून काँग्रेसचा वीर सावरकरद्वेष आता अत्यंत हीन पातळीवर पोहचला आहे, असेच ध्वनित होऊ लागले आहे.

काँग्रेस वीर सावरकर यांचा इतक्या घाणेरड्या पातळीवर येऊन विरोध करू लागली, ही काँग्रेसला लागलेली शेवटची घरघर आहे, हेच दिसते. वीर सावरकर यांच्या सारख्या सूर्यावर थुंकल्यामुळे थुंकी कुणाच्या तोंडावर पडेल, हे काही सांगायला नको. त्यामुळे स्वतःचे अधिकाधिक हसे आणि नुसतेच हसे नाही, तर महाराष्ट्रातीलही जनाधार काँग्रेस गमावणार आहे. हे काँग्रेसला लक्षात येत नाही, ही काँग्रेस पक्षाची बालबुद्धीच म्हणावी लागेल. जर तुमचा विरोधक आत्महत्या करायला निघाला असेल, तर त्याला का थांबवावे?, असे नेपोलियन म्हणायचा. त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने आता राजकीय आत्महत्याच कारण्याचे ठरवले असेल, तर त्याला कोण काय करणार? आणि काँग्रेसला का वाचवायचे?
डॉ. सच्चिदानंद शेवडे, सावरकर साहित्याचे अभ्यासक, राष्ट्रीय प्रवचनकार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here