कोरोनाच्या पहिल्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय उत्तम प्रकारे परिस्थिती हाताळली होती, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या इतक्या झपाट्याने वाढत गेली कि, अवघ्या देशातील आरोग्य व्यवस्था अपुरी पडली. ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवू लागला. परिस्थितीसमोर अवघा देश हतबल होऊ लागला. तरीही केंद्र सरकार कौशल्याने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस या परिस्थितीचा ‘हत्यार’ म्हणून वापर करण्याच्या विचारात होती. त्यासाठी ‘टूलकिट’ बनवण्यात आले. त्याआधारे परस्पर मदत गरजूंपर्यंत पोहचवणे आणि काँग्रेसची प्रतिमा उंचावून पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्याचे कारस्थाने रचण्यात आले. या मागील सूत्रधार युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांची जेव्हा दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरु केली, तेव्हा सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
काँग्रेस म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’!
याविषयी भाजपने स्वतः सविस्तरपणे हे संपूर्ण टूलकिट कसे कार्यान्वित करण्यात आले, हे देशाला उलगडून सांगितले आहे. त्यावर काँग्रेसने लागलीच आक्षेप घेत दिल्ली पोलिस आयुक्तांकडे जाऊन भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रवक्ता संबित पात्रा यांच्याविरूद्ध तक्रार केली आहे. असे असले तरी दिल्ली पोलिसांनी या टूलकिटच्या दृष्टिकोनातून काँग्रेसच्या इंडियन युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. श्रीनिवास यांचा पाठिंब्यासाठी आता अनेकजण सोशल मीडियात सक्रिय झाले आहेत. अशा प्रकारे काँग्रेसकडून चोराच्या उलट्या बोंबा सुरु झाल्या आहेत.
काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा कमी खतरनाक नाही.
'इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा', असे आदेश यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते. pic.twitter.com/6FYQveTYrV— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 18, 2021
(हेही वाचा : ‘तौक्ते’तील नौदलाचे सर्वात मोठे बचावकार्य! नौदलाच्या अधिकाऱ्यांची कबुली!)
श्रीनिवास निघाले ‘टूलकिट’चे सूत्रधार!
- या टूलकिटमध्ये कोरोना महामारीत अधिकाधिक गरजू रुग्णांना इंडियन युथ काँग्रेसच्या माध्यमातून मदत करण्यास सांगितले होते. त्यामाध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिमा उंचावण्याचे ध्येय देण्यात आले होते. त्यादृष्टीने श्रीनिवास तंतोतंत कामे करत होते.
- श्रीनिवास यांनी न्यूझीलँडच्या दूतावासाने कसे इंडियन युथ काँग्रेसकडे ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली, हे सोशल मीडियातून पसरवले. मात्र त्यानंतर स्वतः दूतावासाने ‘आम्ही भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाला संपर्क केला नाही, म्हणून माफी मागतो’, असे म्हटले. मात्र तोवर श्रीनिवास यांनी ‘टूलकिट’ प्रमाणे याचा राजकीय फायदा उठवला होता.
- टूलकिटप्रमाणे पत्रकार आणि महत्वाच्या व्यक्तीकडून मदत मागितली गेल्यास तातडीने ती पूर्ण करण्यात येऊ लागली. वरिष्ठ पत्रकार रुबिका लियाकत, चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनीही सोशल मीडियाद्वारे इंजेक्शन किंवा आयसीयू बेडची मदत करण्याचे आवाहन केले असता श्रीनिवास यांनी तात्काळ त्याला टॅग करत मदत पुरवण्याचे आश्वासन दिले.
बैंगलोर में इंजेक्शन के लिए कुछ प्रयास करता हूँ ।#SOSIYC
— Srinivas BV (@srinivasiyc) April 27, 2021
I am forwarding this request to @IYCKarnataka for the further follow up.
Team please do the needful. #SOSIYC
— Srinivas BV (@srinivasiyc) May 7, 2021
काँग्रेसधार्जिण्या माध्यमांचेही ‘टूलकिट’ प्रमाणे वर्तन!
कोरोनासारख्या महामारीत एकीकडे केंद्र सरकार पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच करत नसताना दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडियन युथ काँग्रेस कशी जनसेवा करत आहे, हे दाखवण्यासाठी काँग्रेसधार्जिणे प्रसारमाध्यमेही ‘टूलकिट’प्रमाणे सक्रिय झाली. त्यांनी आता श्रीनिवास हा एकमेव आहे, जो या महामारीतही तळागाळात जाऊन मदतकार्य करत आहे, हे दाखवण्यास सुरुवात करू लागले. काही माध्यमांनी श्रीनिवास यांची ते कसे मदतकार्य करत आहे यादृष्टीने मुलाखती प्रसिद्ध केल्या.
Watch now: Srinivas BV @srinivasiyc, national president, Indian Youth Congress @IYC, in conversation with @ShekharGupta at #ThePrintOTC
⁰⁰https://t.co/ojJXk1wP0I⁰⁰Our partners: @IIFLWEALTH, @aubankindia, @globinsure, @flyspicejet
— ThePrintIndia (@ThePrintIndia) May 11, 2021
IYC President @srinivasiyc comes from humble middle class family with no money power or remotest political connection. "It is because of @RahulGandhi that I am able to serve people today," he tells National Herald in this #ExclusiveInterview. #srinivasBV https://t.co/Kzzll523FT
— Sanjukta Basu (@sanjukta) May 15, 2021
जेव्हा चौकशी सुरु झाली तेव्हा दुसरी फळी समोर आली!
जेव्हा दिल्ली पोलिसांनी त्या ‘टूलकिट’मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याच्या मुद्द्यावरून श्रीनिवास यांची प्राथमिक चौकशी सुरु केली असता त्यांच्या पाठिंब्यासाठी लागलीच दुसरी फळी कार्यरत झाली. अभिनेत्री स्वरा भास्कर आणि व्यंगचित्रकार सतीश आचार्य हे श्रीनिवास यांचे कौतुक करण्यासाठी सोशल मीडियात सक्रिय झाले. ‘सरकारने ज्यांना मारायला सोडून दिले तिथे काँग्रेस निष्काम भावनेने लोकांची मदत करत आहे, श्रीनिवास यांना पाठिंबा द्या’, असे स्वरा हिने ट्विट केले.
Raise your voice for people who have worked tirelessly & selflessly to help citizens who have been left to die by the govt. they trusted! @srinivasiyc & his team #SOSIYC have done heroic yeomen service in these dark times! More power to you Srinivas ji & @IYC #IStandWithIYC 💙
— Swara Bhasker (@ReallySwara) May 14, 2021
पी. चिदंबरमही पाठिंब्यासाठी पुढे आले!
तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम हेही श्रीनिवास यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनीही ट्विट करत ‘श्रीनिवासची चौकशी करणाऱ्या दिल्ली पोलिसांची लाज वाटते. गुन्हा दाखल झाला नसताना ते श्रीनिवास यांची चौकशी कशी करू शकतात?’ असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.
Shame on Delhi police who are questioning IYC President B V Srinivas
How can anyone be questioned without an FIR?
Is there an FIR? Let the Delhi police make public the FIR.
Delhi police will never live down this shameful attempt to suppress humanitarian work.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 14, 2021
त्याचवेळी व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनीही श्रीनिवास यांच्या समर्थनार्थ कार्टून प्रसिद्ध केले.
COVID warrior Srinivas BV questioned by Delhi Police. #srinivasbv pic.twitter.com/17jkrnAHZL
— Satish Acharya (@satishacharya) May 14, 2021
कार्यकर्तेही झाले सक्रिय!
यानंतर देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीनिवास यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात सक्रिय झाले. याच टूलकिटमध्ये स्थानिक नेत्यांना त्यांच्या त्यांच्या ओळखीच्या रुग्णालयातील खाटा अडवून ठेवण्यास सांगण्यात आले. त्या खाटा जे कोणी काँग्रेसकडे मदत मागतील त्यांना देण्याचे सांगण्यात आले होते.
Name :- Srinivas BV
Crime :- Saving LivesHis first reaction:- we are not scared. We will continue our relief work.#SOSIYC #IStandWithIYC pic.twitter.com/rAt756NUg7
— Bunty Shelke – MyLeaderRahulGandhi 🇮🇳 (@Buntyshelke_inc) May 14, 2021
कांग्रेस अपनों को सांसे देने के लिए दिन रात सेवा कर रही है और भाजपा लोगों की सांसो को छिनने में लगी हुई है।@RahulGandhi जी के दिशा निर्देश पर @srinivasiyc जी और @sosiyc के ये जांबाज योद्धा अपनी जान की परवाह किए बिना इस मानवता के सेवा कार्य मे बहुत संजीदगी के साथ जुटे हुए है. pic.twitter.com/tEjtJTgxUQ
— Vivek Mehta | विवेक मैहता (@VivekINC03) May 12, 2021
मात्र आता काँग्रेसने हा भाजपचा बनाव असल्याचे म्हटले आहे. त्याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राजीव गौडा यांनी भाजपाला दिला आहे.
Join Our WhatsApp Community