गोरखपूर मंदिर हल्ल्याचं कनेक्शन नवी मुंबईच्या ‘त्या’ मस्जिदीशी?

96

उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूरमध्ये मंदिरावर झालेल्या हल्ल्याचे कनेक्शन नवी मुंबईतील एका रहिवासी इमारतीत असणाऱ्या मस्जिदीशी जोडले आहे. युपी एटीएसने अटक केलेला आरोपी मुर्तजा अब्बासी हा काही काळ नवी मुंबईतील ज्या इमारतीत राहण्यास होता त्याच इमारतीच्या तळमजल्यावर एक मस्जिद असून या मस्जिदशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी नवी मुंबई महानगर पालिकेकडून मागवली आहे.

काय आहे प्रकरण?

गोरखपूर येथील मंदिरावर हल्ला करणारा आरोपी मुर्तजा अहमद अब्बासी हा वडिलांसोबत नवी मुंबईत राहत होता. यूपी एटीएसने अलीकडेच नवी मुंबईतील त्या ताज हाइट्स इमारतीत जाऊन मुर्तजाची माहिती काढण्याच्या प्रयत्न केला. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी रवींद्र पाटील अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ताज हाईट्स येथे चौकशीदरम्यान, गोरखपूर हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी मुर्तजाचे वडील मुनीर अब्बासी हे नवी मुंबईतील ताज हाईट्स येथील फ्लॅटमध्ये आले होते.

(हेही वाचा – Gorakhnath Mandir Attack: युपी ATS चौकशीसाठी मुंबईत दाखल)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत तळमजल्यावर मशीद असल्याची माहिती मिळाली आहे. तेथे जाऊनही मुर्तजाची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मुनीर खानचा भाडेकरू मुस्लिम खान याचा जबाबही नोंदवला आहे. त्यासोबत मुनीर खान ज्या घरात राहत होता त्या घरातील व्यक्तीचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. मुर्तजाचे वडील मुनीर अब्बासी हे मुंबईतील एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करायचे. पूर्वी तो नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील मिलेनियम टॉवरमध्ये राहत होता, मात्र २०१३ मध्ये ते घर विकल्यानंतर तो ताज हाइट्सच्या दुसऱ्या मजल्यावर २०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहायला गेला.

या मशिदीच्या माहितीच्या शोधात महाराष्ट्र एटीएस

या इमारतीच्या तळमजल्यावर मशीदही बांधण्यात आली आहे. आता नवी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र एटीएस या मशिदीची माहिती घेत आहेत. रहिवासी इमारतीत असलेल्या या मशिदीबाबत पोलिसांनाही माहिती नव्हती, त्यामुळे आता पोलिसांनी नवी मुंबई पालिकेला पत्र लिहून या इमारतीची कायदेशीरता माहिती जाणून घेतली आहे. याशिवाय सुरक्षा यंत्रणा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, मुर्तजा अब्बासी या मशिदीत कधी यायचा, तो कोणाच्या संपर्कात होता. मुर्तजा येथे कधीपासून आला, त्याच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्ती उपस्थित आहेत का, जे धर्मांधतेच्या कामात गुंतलेले आहेत? याची माहिती काढली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.