‘हलाल’ला विरोध का आणि कसा कराल?

122

भारतात ‘हलाल’च्या माध्यमातून मुसलमानांची समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. हिंदूंचा पैसा मुसलमान संघटनांकडे जमा होत आहे. हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या संघटनांपैकी जमियत उलेमा ए हिंद ही संघटना दहशतवाद्यांना न्यायालयीन मदत पुरवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘हलाल’च्या माध्यमातून भारतातून जमा होणार निधी हा भारताच्या सुरक्षेला धोका पोहचवण्यासाठी वापरला जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे आता या हलालला विरोध होऊ लागला आहे. हा विरोध करण्यामागे काय आहे भूमिका आणि कशाप्रकारे हलालला विरोध करायचा हे जाणून घेऊया.

हिंदूंनी हलाल का नाकारावे?

इस्लामच्या श्रद्धास्थानाला अर्पण केलेले ‘हलाल’ अन्न हिंदूंनी का घ्यावे ? – ‘हलाल’अनुसार पशूहत्या करतांना ‘बिस्मिल्लाह’चा कलमा बोलून आणि मक्केच्या दिशेने पशूचे तोंड करून त्या पशूला ‘अल्लाह’ला अर्पण केले जाते. ‘अल्लाह’ला अर्पण केलेले अन्न त्याला मानणारे मुसलमान खाऊ शकतात; मात्र तेच अन्न हिंदू, शीख आणि अन्य धर्म-पंथियांनी का ग्रहण करावे ? तसेच ज्या मंदिरांत मांसाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे, तेथील हिंदूंनी मांस ‘हलाल’ नसल्याची निश्चिती करावी. या संदर्भात मुसलमानांच्या ‘हलाल’वर बहिष्कार घालणे अयोग्य असल्याचे कोणी सांगितल्यास त्यांना लक्षात आणून दिले पाहिजे की, वर्ष २००७ मध्ये मध्यप्रदेश शासनाने ‘इस्कॉन’ मंदिराकडे शाळांमधील माध्यान्ह भोजन पुरवण्याचे कंत्राट दिल्यानंतर त्याला मुसलमानांनी विरोध केला होता. मुसलमान मौलवींचा दावा होता की, ‘इस्कॉन’ संस्था बनवलेले अन्न प्रथम श्री जगन्नाथाला अर्पण करते. त्यामुळे ‘तो प्रसाद मुसलमान मुलांना खाऊ घालणे’, हा इस्लामचा अपमान आहे. जर ‘इस्कॉन’ने बनवलेले भोजन मुसलमानांना चालत नाही, ‘हलाल’ भोजनाचा स्वीकार हिंदूंनी का केला पाहिजे?

‘हलाल’ मांस अनिवार्य करणाऱ्यांच्या विरुद्ध ग्राहक अधिकारांचा उपयोग करा! – ‘हलाल’ची अनिवार्यता मुसलमानांसाठी आहे; अन्य धर्म-पंथियांसाठी नाही. त्यामुळे ‘हलाल’ मांस किंवा उत्पादने यांचे विक्रेते मुसलमानांना ‘हलाल’ मांसाची किंवा उत्पादनांची विक्री करू शकतात; मात्र हिंदूंनाही तेच ‘हलाल’ मांस किंवा उत्पादन घेण्याचा आग्रह करणे, हे ‘भारतीय संविधाना’ने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या तसेच ग्राहक अधिकारांच्या विरोधात आहे. ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ. सी.’ यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांनी भारतातील त्यांची सर्व दुकाने १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित असल्याची घोषणा केली आहे. ‘मॅकडोनाल्ड’मध्ये जाणाऱ्या बहुसंख्य हिंदूंना इस्लामी मान्यतेनुसार ‘हलाल’ पदार्थच खाऊ घालणे, हा हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्याचा अनादर आहे. त्यामुळे अशा बहुराष्ट्रीय आस्थापनांवर खटले दाखल केले पाहिजेत. अशाच पद्धतीने ‘भारतीय पर्यटन विकास महामंडळ’ (आय.टी.डी.सी.), आणि रेल्वेचे ‘आय.आर.सी.टी.सी’, या शासकीय संस्थांवरही ‘हलाल’ मांस पुरवणाऱ्यांनाच कंत्राट देत असल्याचा आरोप होत होता. शासनावर दबाव आणून या शासकीय संस्थांमधून ‘हलाल’ भोजन अनिवार्य करणे बंद केले पाहिजे.

No Halal

मांसाहारी हिंदु आणि शीख यांनी ‘झटका’ मांसाचा आग्रह धरावा! – हिंदु आणि शीख यांच्यासाठी ‘हलाल’ मांस निषेधार्ह मानले गेले आहे. त्यांच्या धर्मात ‘झटका’, म्हणजे पशुहत्येत तलवारीच्या एका घावात पशूचे मुंडके वेगळे केलेल्या मांसाची मान्यता आहे. त्यामुळे मांसाहारी हिंदु आणि शीख यांनी प्रत्येक भोजनालयात ‘झटका’ मांसाची मागणी केल्यास त्यांना ‘हलाल’ मांस भक्षण करावे लागणार नाही आणि त्यातून हिंदु खाटिक समाजबांधवांना व्यवसायही मिळेल.

कर्नाटक राज्यात हिंदूंनी ‘हलाल’ पद्धतीला केलेला विरोध – कर्नाटक राज्यात गुढीपाडव्यानंतर दुसऱ्या दिवशी मांसाहार करण्याची (होसा तोडाकू) प्रथा आहे. या दिवशी कर्नाटकातील हिंदूंनी प्रथमच ‘हलाल’ मांस विकत न घेण्याचा निर्णय घेतला आणि उपलब्ध माहितीनुसार त्या दिवशी मुसलमानांच्या व्यवसायाची ७० टक्के हानी झाली. तसेच देवतांच्या यात्रेत मुसलमानांना ‘पशूंचा बळी देण्यास येऊ नका’, असे सांगून हिंदूंनी ‘हलाल’ पद्धतीला विरोध केला. त्यांचे अनुकरण देशभरातील हिंदूंनी केले पाहिजे.

हिंदूंच्या विरोधानंतर ‘बिग बास्केट’ने ‘झटका’ मांस विकण्यास प्रारंभ करणे – ‘ऑनलाइन’ खाद्यपदार्थ विकणाऱ्या ‘बिग बास्केट’ या आस्थापनाने घोषित केले की, ‘आम्ही केवळ ‘हलाल’ मांसाचीच विक्री करतो.’ त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी ‘बिग बास्केट’च्या विरोधात अभियान चालू केले. हिंदूंच्या या प्रखर विरोधामुळे त्यांनी माघार घेऊन आता ‘झटका’ मांसही उपलब्ध करून दिले आहे.

‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरुद्ध हिंदूंनी केलेला यशस्वी प्रयत्न

‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात जनजागृती – ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची समस्या नवीन असल्याने त्याविषयी सर्वसामान्य जनतेला सर्व माहिती देऊन जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’कडून विविध क्षेत्रांतील व्यक्ती आणि संघटना यांसाठी व्याख्याने, ‘पॉवर पॉईंट सादरीकरण’, तसेच जागृती बैठका आयोजित करण्यात आल्या. या माध्यमातून जनता आणि व्यापारी यांच्यात झालेल्या जागृतीने त्यांनी पुढील कृती स्वयंस्फूर्तीने चालू केल्या.

‘अपेडा’ला निर्यात परवान्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ बंधनकारक करण्याचा निर्णय रहित करण्यास भाग पाडणे भारत शासनाच्या ‘कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (APEDA – अपेडा)’ या विभागाने निर्यात परवान्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे, तसेच कारखान्यात एका मुसलमान निरीक्षकाची नियुक्ती करणे बंधनकारक केले होते. प्रत्यक्षात भारतातून निर्यात होणाऱ्या मांसापैकी ४६ टक्के मांस (६ लाख टन, म्हणजे वार्षिक २३ हजार ६४६ कोटी रुपयांचे मांस) व्हिएतनाम या इस्लामी नसलेल्या देशात निर्यात होते. त्यामुळे व्हिएतनाम देशात मांस निर्यात करणार्‍यांना अनावश्यकरीत्या ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत होते. केंद्रशासनाच्या या पक्षपाती धोरणाचा ‘हिंदु जनजागृती समिती’ने विरोध केला. त्या नंतर ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ने केंद्रीय गृहमंत्री आणि वाणिज्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीचा मोठा परिणाम झाला आणि केंद्रशासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने ५ जानेवारी २०२१ या दिवशी ‘अपेडा’च्या नियमावलीतून सदर नियम रद्द केला.

लोकप्रतिनिधींना दिलेल्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद मिळणे! – ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संदर्भात उत्तरप्रदेशचे सध्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना निवेदन दिले. त्यांनी त्वरित त्याची दखल घेऊन केंद्र शासनाला ‘त्रयस्थ खाजगी संस्था ‘हलाल प्रमाणपत्र’ देत असल्याने त्यांच्या विरोधात चौकशी करून कारवाई करावी’, अशी मागणी करणारे पत्र पाठवले.
ठिकठिकाणी ‘हलाल’विरोधी कृती समिती’ची स्थापना! – ‘हलाल अर्थव्यवस्थे’ला विरोध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर ‘हलाल’विरोधी कृती समिती’ची स्थापना होऊ लागली आहे. यात समाजातील सर्व स्तरांतील राष्ट्रनिष्ठ व्यक्तींना आणि संघटनांना सहभागी करून घेऊन ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात आंदोलन उभे करण्याचे नियोजन आहे.

वैयक्तिक स्तरावर करावयाच्या कृती

  • हिंदूंचा धार्मिक अधिकार म्हणून ‘हलाल’ मांस खरेदी करणे बंद करा !
  • मांसाहार करणाऱ्यांनी ‘झटका’ मांसाचा आग्रह धरावा आणि तेच विकत घ्यावे !
  • ‘हलाल’ मांस, तसेच उत्पादने अनिवार्य करणाऱ्यांच्या विरोधात ग्राहक अधिकारांचा भंग करणे, धर्मस्वातंत्र्य नाकारणे आणि धार्मिक भावना दुखावणे, या संदर्भातील तक्रारी दाखल करा !
  • ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणाऱ्या उत्पादकांची उत्पादने, तसेच ‘हलाल’चा शिक्का असणारी उत्पादने विकत घेण्यापूर्वी राष्ट्रहिताच्या दृष्टीने विचार करून अन्य पर्याय उपलब्ध असल्यास त्यांना प्राधान्य द्या !

जनतेने केलेल्या कृती

– अनेकांनी बाजार आणि ‘मॉल’ यांमधून साहित्य खरेदी करतांना ‘उत्पादनांवर ‘हलाल’चे चिन्ह पाहून, त्याला पर्यायी दुसरे उत्पादन घेण्यास प्राधान्य दिले.

व्यापाऱ्यांनी केलेल्या कृती

– घाऊक विक्रेत्याकडून एखादे ‘हलाल’ प्रमाणित उत्पादन दिले जात असल्यास व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे दुसऱ्या आस्थापनाच्या उत्पादनाची मागणी करणे प्रारंभ केले.

‘झटका’ मांसाची दुकाने चालू करणे

– ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संदर्भात माहिती मिळाल्यावर अनेक ठिकाणी ‘झटका’ मांसाची विक्री करणारी दुकाने चालू करण्यात आली.

‘ट्विटर ट्रेंड’द्वारे राष्ट्रीय पातळीवर जागृती करणे

– ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात ‘ट्विटर’ या समाजमाध्यमावर अनेक ‘ट्रेंड’ चालवण्यात आले. वर्ष २०२० मध्ये ‘#BoycottHalalProducts’ (‘हलाल उत्पादनांवर बहिष्कार घाला !’) हा हॅशटॅग ‘ट्विटर ट्रेंड’मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकावर होता, तसेच तो सलग २ दिवस राष्ट्रीय स्तरावर चर्चेत होता. त्यामुळे राष्ट्रीय दूरचित्रवाहिन्यांनी त्याची दखल घेऊन त्याविषयी वृत्ते प्रसारित केली आणि चर्चा आयोजित केल्या.

‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संदर्भात निवेदन देणे

– काही ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांना भेटून ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात निवेदन सादर केले. ‘हिंदु विधीज्ञ परिषदेने’ भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना या विषयीचे निवेदन पाठवले.

असा करा ‘हलाल’वर हल्लाबोल

१.‘हलाल’मुक्त उत्पादनांची सूची बनवून ती स्थानिक दुकानदारांना उपलब्ध करून द्या !

२.नगरपालिकेद्वारे संचालित पशूवधगृहात केवळ ‘हलाल’ मांस उपलब्ध केले जात असल्यास त्यांच्या विरोधात तक्रार करा!

३.शासकीय आस्थापनांत केवळ ‘हलाल’ खाद्यपदार्थ दिले जात असल्यास त्याला विरोध करा !

४.भारत शासनाच्या ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्था वगळता अन्य त्रयस्थ खाजगी मुसलमान संस्थांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यास बंदी घालण्याची मागणी निवेदन, पत्र, इ-मेल, फॅक्स आदींद्वारे करा !

५.‘हलाल प्रमाणपत्रे’ देणाऱ्या संस्थांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करा !

६.‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरुद्ध निवेदन बनवून ते व्यापारी संघटन, ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ आदींच्या ‘लेटरहेड’वर ‘अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन’ (FSSAI), ‘प्रधानमंत्री कार्यालय’ यांना पाठवा !

७.आपल्या भागातील हिंदुत्वनिष्ठ राजकीय नेत्यांना या संकटाची माहिती द्या ! त्यांना ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संदर्भात विधानसभेत, तसेच संसदेत शासनाला प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करा !

८.हिंदूंना ‘हलाल’ पदार्थच खाऊ घालणाऱ्या ‘मॅकडोनॉल्ड’, ‘के.एफ.सी.’ इत्यादी आस्थापनांच्या विरोधात तक्रारी दाखल करून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करा !

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.