स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची मंगळवार, २८ मे रोजी १४१वी जयंती आहे. यानिमित्ताने इस्त्रायलचे कॉन्सुल जनरल कोबी शोशानी यांनी वीर सावरकर यांना X वरील पोस्टद्वारे अभिवादन केले आहे. शोशानी यांनी मागील वर्षी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला दिलेल्या भेटीच्या वेळीचा फोटो पोस्ट करून आठवणींना उजाळा दिला आहे.
My tributes to Veer Savarkar on his 141st birth anniversary. He was the embodiment of courage, patriotism and sacrifice for the motherland. A great poet and visionary, who supported the idea of Israel as early as 1922 and Israel’s right to defend itself. pic.twitter.com/Y9KtrRbC7C
— Kobbi Shoshani 🇮🇱 (@KobbiShoshani) May 28, 2024
(हेही वाचा Veer Savarkar यांच्या सैनिकीकरणामुळे आपल्या देशाचं अस्तित्व टिकून आहे; मंजिरी मराठे यांचे प्रतिपादन)
मागील वर्षी इस्त्रायलचे कॉन्सुल जनरल कोबी शोशानी यांनी स्मारकाला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत स्मारकातील वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह स्वप्नील सावरकर हे उपस्थित होते. हा फोटो कोबी शोशानी यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जयंतीनिमित्ताने X वर पुन्हा पोस्ट केला. त्यात शोशानी यांनी म्हटले आहे की, ‘वीर सावरकरांना त्यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ते धैर्य, देशभक्ती आणि मातृभूमीसाठी त्यागाचे मूर्त स्वरूप होते. एक महान दूरदर्शी कवी ज्याने १९२२च्या सुरुवातीच्या काळात इस्रायलच्या स्व संरक्षणाच्या संकल्पनेला पाठिंबा दिला होता.’
Join Our WhatsApp Community