BYJU’S आणि शाहरूख खानला दणका! काय म्हणाले ग्राहक आयोग?

72

बायजूस अ‍ॅप कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शैक्षणिक सुविधा पुरवत आहे. या अ‍ॅपच्या करारात नमूद केल्याप्रमाणे योग्य सुविधा नसल्यामुळे लाभार्थ्यांनी थेट ग्राहक आयोगाकडे धाव घेतली आहे. करारातील अटी पूर्ण न केल्यामुळे तक्रारदाराने कंपनीला नोटीस पाठवून दिलेली रक्कम परत मागितली आहे. परंतु कंपनीने अपेक्षित उत्तर न दिल्यामुळे तक्रारदाराने थेट ग्राहक आयोगाकडे धाव घेतली. यावर आयोगाने बायजूसच्या संचालकांना, तसेच बायजूसचा ब्रँड अॅम्बॅसडर अभिनेता शाहरूख खान यांना भरपाईचे आदेश दिले आहेत.

भरपाई द्यावी

आयोगाने कंपनीने अनुचित व्यापार केला, असे सांगत ग्राहकाने १ लाख १० हजार रुपये दिल्याचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच तक्रारदाराला मानसिक त्रास झाल्यामुळे एकत्रित ५० हजार रुपये भरपाई द्यावी, असे आदेश आयोगामार्फत देण्यात आले आहेत. पुणे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष उमेस जावळीकर, सदस्य संगीता देशमुख व क्षितिजा कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला आहे.

( हेही वाचा : कोण आहेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत? जाणून घ्या…)

का केली तक्रार?

चौथी ते बारावीच्या शिक्षणासाठी ग्राहकाने बायजूससमवेत सव्वा लाख रुपयांचा करार केला होता. तक्रारदाराने १५ हजार रुपये ऑनलाईन जमा केले, परंतु कंपनीने अटींची पूर्तता न केल्यामुळे तक्रारदाराने कंपनीला नोटीस पाठविली. यानंतर कंपनीने याउलट तक्रारदाराच्या नावे १ लाख १० हजार कर्ज दाखवून ही रक्कम जमा करून घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.