कोरोना बाधिताच्या संपर्कात आलाय? काय कराल, वाचा ‘ICMR’ची नवी नियमावली

देशभरात कोरोनासह ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने देखील हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढली आहे. या वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येवरून रुग्णसंख्येदरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना चाचणीबाबत नवीन सुधारित नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत असे सांगण्यात आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्सनुसार, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

(हेही वाचा – ओमायक्रॉनच्या चाचण्या घटल्या! कारण वाचून थक्क व्हालं…)

कोरोना रुग्णांचा संपर्कातील व्यक्तीच्या कोरोना चाचणीबाबत आता आयसीएमआर अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्या खालील प्रमाणे…

चाचण्यांबाबत काय म्हणाले आयसीएमआर…

  • आंतरराज्य देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, मात्र आंतरराज्य देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना कोरोना चाचणी गरजेची आहे.
  • कोरोना चाचणी करण्यासाठी RT-PCR, TrueNat, CBNAAT, CRISPR, RT-LAMP, रॅपिड मोलेक्युलर टेस्टिंग सिस्टम किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) द्वारे चाचणी केली जाऊ शकते.
  • पॉइंट ऑफ केअर चाचणी (घरगुती किंवा स्व-चाचणी किंवा RAT) आणि मॉल्युकर चाचणीत एक पॉझिटिव्हला पुन्हा चाचणी करण्याशिवाय बाधित मानले पाहिजे.
  • लक्षणे असलेल्या व्यक्तीने घरी केलेली चाचणी निगेटिव्ह आली असेल तर त्या व्यक्तीने आरटी-पीसीआर चाचणी केली पाहिजे, असे आयसीएमआरने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here