उत्तर प्रदेशातील धर्मांतरणाचे गुजरात कनेक्शन! २०० हिंदू मुलींना बनवले मुस्लीम

89

गुजरातमध्ये वडोदरा येथील एका धर्मदाय ट्रस्टच्या पदाधिका-याने विदेशातून आलेल्या निधीचा वापर करून २०० हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्यांचा निकाह लावून दिला आहे. याप्रकरणी वडोदरा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून, त्यात ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टीवर व सहकाऱ्यांवर परदेशी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर हा निधी धर्मांतर करण्यासाठी वापरला गेला.

काय आहे प्रकरण?

हा निधी मशिदींच्या बांधकामासाठी, CAA विरोधी आंदोलनाला आणि २०२० मध्ये दिल्लीतील दंगलीनंतर लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी, दंगलीच्या आरोपाखाली अटक केलेल्यांना कायदेशीर मदत करण्यासाठी या ट्रस्टने वापर केला. तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपी, मोहम्मद उमर गौतम याने २०० हिंदू मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्यांचे लग्न लावून दिले व सुमारे १००० लोकांचे धर्मांतर केले. इस्लाम धर्म स्वीकारलेल्या लोकांमध्ये १० कर्णबधिरांचा समावेश असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मोहम्मद उमर गौतम हा दिल्लीचा रहिवासी असून, १८६० पानांच्या आरोपपत्रात पाच आरोपींची नावे आहेत. हे आरोपपत्र वडोदरा येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.ए.पटेल यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

( हेही वाचा : बापरे! 10 लग्न, 100 प्रेयसी अन् बरचं काही…अखेर गजाआड! )

मुख्य आरोपी गौतमला एटीएसने पकडले

या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद उमर गौतमला यूपी एटीएसने (ATS) जूनमध्ये पकडले होते. त्यानंतर यूपी एटीएसने गौतमचा साथीदार शेख याला वडोदरा येथून पकडले. धर्मदाय ट्रस्टच्या निधीचा गैरवापर करून धर्मांतर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यानंतर ऑगस्टमध्ये वडोदरा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) शेख, गौतम आणि इतर साथीदारांविरुद्ध विविध समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.