नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबई बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस या ठिकाणी कॉर्डिलिया क्रूझवर सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून लावली. त्यावेळी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात प्रभाकर साईल हा मुख्य पंच होता. त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
( हेही वाचा : जागेच्या मालकीवरुन झाली दोन वाघांमध्ये झुंज अन् एकाचा मृत्यू )
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी पंच राहिलेल्या प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंडारे यांनी ही माहिती दिली आहे. नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डिलिया क्रूझवर छापा टाकला. यामध्ये किंग खानचा मुलगा आर्यन याच्यासह काही जणांना अंमली पदार्थ सेवनाशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रभाकर साईल नावाच्या व्यक्तीने समीर वानखेडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली असा आरोप केला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली.
आता मिळालेल्या माहितीनुसार, साक्षीदार प्रभाकर साईल याचा मृत्यू झाला आहे. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील माहुल भागात प्रभाकर साईल यांचे घर आहे, तेथेच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
Join Our WhatsApp Community