कोविड बाधितांना पालिकेच्या ‘वॉर्ड वॉर रूम’चा आधार! ‘हे’ आहेत विभागीय संपर्क क्रमांक

111

कोविड बाधित रुग्णांना आवश्यक व तातडीने रुग्णशय्या उपलब्ध होण्यासह ‘कोविड-१९’ संबंधी विविध अडचणींबाबत नागरिकांना थेट मार्गदर्शन मिळावे. या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने विकेंद्रित पद्धतीने रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed Management) जून २०२० पासून अंमलात आणली असून ती आजतागायत अव्याहतपणे कार्यरत आहे. महानगरपालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर ‘वॉर्ड वॉर रूम्स’ म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. कोविड बाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक ह्यांना ‘कोविड-१९’ बाबत मदत व मार्गदर्शन हवे असेल, तर वॉर्ड वॉर रूमकडे संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये बाधित रुग्णांना आवश्‍यकतेनुसार रुग्णालयांमध्ये रुग्ण शय्या मिळवून देणे तसेच गृहविलगीकरणात बाधित असलेल्या रुग्णांना योग्य स्वरूपाचे समुपदेशन करणे ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी ‘वॉर्ड वॉर रूम’ महत्वाची कामगिरी बजावत आहेत. जून २०२० पासून विकेंद्रित पद्धतीने २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावरून, रुग्णांसाठी ही कार्यप्रणाली नियमितपणे सुरु आहे. याद्वारे कोविड बाधित रुग्णांना विभाग स्तरावरचं अधिक जलद, सुलभ व प्रभावीपणे आरोग्य सेवा देण्यास मदत होत आहे.

( हेही वाचा : कोरोना बूस्टरसाठी व्हा सज्ज! अशी करा नोंदणी )

या ‘वॉर्ड वॉर रूम’ अर्थात विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. उल्लेखित ‘लँडलाईन’ दूरध्वनी क्रमांकांवर भ्रमणध्वनीवरून संपर्क साधावयाचा झाल्यास क्रमांकापूर्वी ‘०२२’ हे आकडे जोडणे आवश्यक ‌आहे.

  • ‘ए’ विभाग ०२२ – २२७०-०००७
  • ‘बी’ विभाग ०२२ -२३७५-९०२३, २३७५९०२५
  • ‘सी’ विभाग ०२२-२२१९-७३३१
  • ‘डी’ विभाग ०२२-२३८३-५००४, ८८७९७१३१३५
  • ‘ई’ विभाग ०२२-२३७९-७९०१,
  • ‘एफ दक्षिण’ विभाग ०२२- २४१७-७५०७, ८६५७७९२८०९
  • ‘एफ उत्तर’ विभाग ०२२- २४०१-१३८०, ८८७९१५०४४७, ८८७९१४८२०३
  • ‘जी दक्षिण’ विभाग ०२२-२४२१ ९५१५, ७२०८७६४३६०
  • ‘जी उत्तर’ ०२२-२४२१-०४४१, ८२९११६३७३९
  • ‘एच पूर्व’ विभाग ०२२-२६६३-५४००
  • ‘एच पश्चिम’ विभाग०२२- २६४४-०१२१
  • ‘के पूर्व’ विभाग ०२२-२६८४-७०००, ८६५७९३३६८१
  • ‘के पश्चिम’ ०२२-२६२०८३८८
  • ‘पी दक्षिण’ विभाग -०२२ २८७८-०००८, ८८२८४७६०९८, ७३०४७७६०९८
  • ‘पी उत्तर’ विभाग ०२२- ६९६०००००
  • ‘आर दक्षिण’ ०२२- २८०५-४७८८, ८८२८४९५७४०
  • ‘आर उत्तर’ विभाग ०२२- २८९४-७३५०, ८३६९३२४८१०
  • ‘आर मध्य’ विभाग ०२२- २८९४-७३६०, ९९२००८९०९७
  • ‘एल’ विभाग ०२२-२६५०-९९०१, ७६७८०६१२७४.
  • ‘एम पूर्व’ विभाग ०२२-२५५२-६३०१, ७२०८६८०५३८
  • ‘एम पश्चिम’ ०२२- २५२८-४०००
  • ‘एन’ विभाग ०२२-२१०१-०२०१
  • एस विभाग ०२२-२५९५-४०००, ९००४८६९७२४
  • टी विभाग ०२२-२५६९-४०००

रुग्णवाहिकांचा कालावधी अधिक लवकर व जलद

प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये दिल्या “दिवसाचे चोवीस तास व आठवड्याचे सातही दिवस” अर्थात ‘२४x७’ तत्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी कार्यरत आहेत. वॉर्ड वॉर रुममुळे कोरोना बाधितांना प्रभावी सेवा देण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. अधिकाधिक कोविड रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा आणि समुपदेशन दिले जात आहे. गरजू कोरोना बाधितांना तात्काळ योग्य रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुलभ व जलद गतीने होत आहे. विभाग कार्यालयांना कोरोना रुग्णसेवेसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापनही विभागीय कक्षाद्वारे होत असल्याने रुग्णवाहिकांचा प्रतिसाद कालावधी ‘अधिक लवकर व जलद’ झाला आहे.

( हेही वाचा : उद्यानांच्या देखभालीसाठी आधी निविदा रद्द, पुन्हा त्याच दरात नेमले कंत्राटदार )

बाधितांच्या समस्यांचे निराकरण

यासोबत गृह विलगीकरणात असलेल्या कोविड बाधितांशी सातत्याने संपर्क साधून त्यांची अद्ययावत माहिती घेणे, नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करणे, स्थानिक पातळीवर कामकाजात योग्य समन्वय साधणे ह्यातून वॉर्ड वॉर रूम यंत्रणेने मध्यवर्ती यंत्रणेवरील ताण हलका तर केलाच पण मुख्य म्हणजे कोविड बाधितांच्या समस्यांचे निराकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. कोविड बाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक ह्यांनी योग्य त्या मदतीसाठी आपापल्या विभाग स्तरावरील ‘वॉर्ड वॉर रूम’ कडे संपर्क साधावा, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.