आग्नेय आशिया आणि युरोपच्या काही भागांमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना इन्फ्लूएंझा सारख्या आजारासाठी आणि तीव्र श्वसन संक्रमणावर पाळत ठेवण्यास सांगितले आहे कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हंटले आहे.
(हेही वाचा – तब्बल ७१ वर्षांपासून ‘या’ गावात होळी, धुळवड खेळतच नाही!)
यासंदर्भात राजेश भूषण यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार इन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि गंभीर श्वसन संक्रमणाची प्रकरणे शोधणे हे सरकारसाठी कोविड व्यवस्थापनाचे आधारस्तंभ आहेत. देशात कोरोना संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याने इन्फ्यूएन्झा आणि श्वसनाच्या आजारांचा तपास संथ झालाय. परंतु, आता इन्फ्यूएन्झा आणि श्वसन रोगाच्या रुग्णांची करोना चाचणी करून संक्रमित नमुने जीनोम टेस्टिंगसाठी पाठवले जातील. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविडचे प्रकार वेळेवर शोधण्यासाठी INSACOG नेटवर्ककडे पुरेसे नमुने सादर केले जातील याची खात्री करण्यास सांगितले आहे. प्रोटोकॉलनुसार तपास सुरू ठेवण्यावर, सर्व खबरदारीचे पालन करण्यावर आणि आर्थिक आणि सामाजिक उपक्रम पुन्हा सुरू करताना जागरुकता न सोडण्यावर त्यांनी भर दिला.
राज्यातील प्रशासनाने गाफील राहू नये
राजेश भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की, आता कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या जास्त नाही, असा विचार करून कोणत्याही राज्यातील प्रशासन आणि प्रशासनाने गाफील राहू नये. तसेच राजेश भूषण यांनी आपल्या पत्रात सर्वांना सतर्क राहताना पाच गोष्टींची काळजी घेण्यास सांगितले आहे. यामध्ये कोरोना चाचणी, उपचार, लसीकरण आणि कोविड-अनुकूल नियम यांचा समावेश आहे.
केंद्रीय स्वास्थ्य सचिव राजेश भूषण ने सभी राज्यों-केंद्र शासित प्रदेशों के सभी अतिरिक्त मुख्य सचिवों, प्रधान सचिवों, स्वास्थ्य सचिवों को पत्र लिखकर कोरोना को लेकर पांच-स्तरीय रणनीति यानी टेस्ट-ट्रैक-ट्रीट-टीकाकरण और #COVID19 उचित व्यवहार का पालन करने पर ज़ोर दिया। pic.twitter.com/zFjOmbkTER
— ANI_HindiNews (@AHindinews) March 18, 2022
पत्राद्वारे राज्यांना इशारा
भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की, दक्षिण पूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये झालेली वाढ पाहता, 16 मार्च रोजी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये राज्ये नमुन्यांचे जीनोम अनुक्रम तयार करण्यास आणि कोविड-19 प्रकरणांच्या संख्येचे मूल्यांकन करण्यास सांगितले. परिस्थितीच्या सखोल निरीक्षणावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
Join Our WhatsApp Community