मुंबईत कोविडच्या चाचण्या वाढणार

नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरांत कोविडच्या चाचण्या वाढवण्याचा  मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा विचार सुरु आहे. डिसेंबर महिन्यात नाताळ तसेच सुट्टया असल्यानं परदेशातून मोठ्या संख्येनं प्रवासी भारतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, कोविड चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली. जागतिक पातळीवर कोरोना अद्यापही पौर्वात्य देशांमध्ये वाढत असल्याने कोविड चाचण्या विमानतळावर प्रामुख्याने वाढवल्या जाणार आहेत.

‘या’ खंडांत मृत्यूंची नोंद लक्षणीय 

 युरोपात बहुतांश ठिकाणी कोविडच्या रुग्णांत लक्षणीय वाढ झाली आहे. युरोपातील देशांत एकूण लोकसंख्येच्या पाच टक्क्यांवर मृत्यू नोंदवले जात आहेत. जागतिक पातळीवर, एकूण लोकसंख्येच्या ६ टक्क्यांवर कोविडमुळे मृत्यू नोंदवले जात ,असल्याची माहिती आरोग्य विभागाने  दिली आहे. त्यात प्रामुख्याने अमेरिका, युरोप आणि आशिया खंडात मृत्यूची नोंद लक्षणीय आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा आठवड्याचा अहवाल  

  •  याबाबतचा आठवड्याचा अहवाल जागतिक आरोग्य विभागाने नुकताच जाहीर केला आहे. युरोप वगळता सर्वत्र कोविडबाबचा मृत्यू दर स्थिर आहे. जगभरातील ३.३ दशलक्ष नव्या रुग्णांपैकी २.१ दशलक्ष रुग्ण युरोपात आढळले आहेत.
  • गेले सात आठवडे सतत युरोपातील पश्चिमेकडील भागांत कोविडचे रुग्ण वाढत आहेत.
  • कुठे संसर्ग कमी होतं आहे – आफ्रिका, मध्य पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात जुलैपासून कोविडचा फैलाव कमी झाला आहे.
  • कुठे संसर्ग वाढत आहे – रशिया, जर्मनी आणि ब्रिटन.

 (हेही वाचा : वानखेडेंना अल्पवयात बारचे परमीट! मलिकांचा नवा आरोप )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here