गुरुवारी एकाच दिवसांत मुंबईत ओमायक्रॉनचे २३४ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र कोरोना आटोक्यात असल्याने काळजीचे कारण नसल्याचेही आरोग्यविभागाकडून सांगण्यात आले. या एकाच दिवसाच्या नव्या रॅकोर्डमुळे राज्यातील ओमायक्रॉनची आतापर्यंतची नोंद ५ हजार ५ वर गेली.
(हेही वाचा – किरीट सोमय्यांनी सांगितलं, 400 कोटींच्या घोटाळ्यात कोणा-कोणाचा सहभाग!)
गृह विलगीकरणाच्या संख्येत कमालीची घट
गेल्या दोन दिवसांत गृह विलगीकरणाच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. ४२ हजार ११८ एवढीत घरी विलगीकरणासाठी सल्ला दिलेल्या माणसांची संख्या उरली आहे. तर केवळ ६०२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर केवळ ३७६ ओमायक्रॉनच्या रुग्णांवर राज्यातील विविध भागांत उपचार सुरु आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी जनुकीय तपासणी सुरुच असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र राज्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत अद्यापही जनुकीय तपासणीची संख्या कमीच आहे. राज्यात आतापर्यंत नोंदवलेल्या ५ हजार ५ रुग्णांपैकी ४ हजार ६२९ ओमायक्रॉनच्या रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे.
काय आहे सध्या कोरोनाची परिस्थिती
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९८.०६ टक्के
- गुरुवारी नव्याने नोंदवलेले कोरोना रुग्ण – ४६७
- गुरुवारी घरी सोडण्यात आलेले रुग्ण – १ हजार १४४
- राज्यात उरलेले कोरोनाचे सक्रीय रुग्ण – ४ हजार ९५३