नागपुरातील सीताबर्डी बाजारातील गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी?

95

देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी भिती देखील वर्तवण्यात येत आहे. सर्वाधिक बाधित झालेल्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईतही ५,६३१ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यासोबतच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचे आकडेही दररोज वाढत आहेत. असे असूनही लोकं कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. असाच प्रकार नागपुरातील सीताबर्डी बाजारात पाहायला मिळाला. नागपुरातील सीताबर्डी बाजारातील हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील म्हणाल की, ही गर्दी कोरोनाला आमंत्रण तर देत नाही ना….

बघा व्हिडिओ

कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सीताबर्डी बाजारामध्ये मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी ही मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांच्या तोंडावर मास्क नाही , कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. तसेच कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढल्याने दुकान ९ वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याने बाजारामध्ये नागरिकांची गर्दी वाढली होती. त्यामुळे सीताबर्डी बाजारातील गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरणार का ? हा प्रश्न प्रशासनाची चिंता अधिक वाढवतोय.

(हेही वाचा – मालमत्ता करात पूर्ण माफी की पुन्हा सूट: महापालिका प्रशासन गोंधळात)

कोरोनाचा पराभव कसा होणार?

एकीकडे सरकार आणि प्रशासनाकडून लोकांना कोरोनापासून वाचण्यासाठी वारंवार सावध केले जात आहे आणि लोकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे, मात्र जनता आपली मनमानी सोडायला तयार नाही. अशा परिस्थितीत कोरोनाचा पराभव कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.