कोरोना महामारीचे संकट अद्याप पुर्णतः टळले नसल्याने भारतासह अनेक देशात खबरदारी घेतली जात आहे. बऱ्याच ठिकाणी अजूनही प्रवासादरम्यान किंवा इतर ठिकाणी कोरोना चाचणी केली जात आहे. यावेळी अनेकांना कोरोना चाचणी करण्यास आवडत नाही. मात्र अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता फक्त आवाजावरून तुम्हाला कोविडची लागण झाली आहे की नाही हे समजू शकणार आहे. यासाठी एक स्मार्टफोन अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.
(हेही वाचा – पुण्यात FDA ची मोठी कारवाई! गणेशोत्सवात ९०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त)
ही कोरोना चाचणी आर्टिफिशियस इंटेलिजेन्स म्हणजे एआय मदतीने होणार आहे. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, हे अॅप अँटिजेन टेस्टपेक्षा अधिक अचूक आहे. त्याशिवाय ही चाचणी स्वस्त दरात होणार आहे. त्याचा वापरही अधिक सहजपणे केला जाऊ शकतो. ज्या ठिकाणी PCR चाचणी करणे महाग आहे. अथवा सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. अशा ठिकाणी हे अॅप्लिकेशन फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे चाचणीसाठी कमी वेळ लागणार असल्याने लोकांच्या वेळेची बचतही होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेदरलँडमधील Maastricht University मधील इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सचे संशोधक Wafaa Aljbawi यांनी सांगितले की, फाइन-ट्यून्ड AI अल्गोरिदमच्या मदतीने कोणाला कोरोनाची लागण झाली आहे, याची माहिती मिळू शकणार आहे.
Join Our WhatsApp Community