बनावट नोटांपाठोपाठ बनावट नाणी; मालाडमधून व्यवसायिकाला १०लाखांच्या बनावट नाण्यांसह अटक

115
भारतीय चलनातील नोटांच्या बनावट छपाई पाठोपाठ बनावट नाणीदेखील तयार करून बजारात वितरित करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील मालाड येथून बनावट नाणी प्रकरणी एका व्यवसायिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याजवळून दिंडोशी पोलिसांनी १० लाख रुपयांची बनावट नाणी जप्त केली आहेत.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

हा व्यवसायिक बनावट नाणी तयार करणाऱ्या एका हरियाणातील टोळीचा सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जिग्नेश गाला (४५) असे अटक करण्यात आलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. मागील आठवड्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून हरियाणा राज्यातून बनावट नाणी तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. ही टोळी संपूर्ण देशभरात भारतीय चलनातील बनावट नाणी वितरित करीत होती. या टोळीला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर तपासात  मुंबईतील व्यवसायिकाचे नाव पुढे आले होते. या अनुषंगाने दिल्ली पोलीस आणि मुंबईतील दिंडोशी पोलीसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मालाड येथून जिग्नेश वोरा याला ताब्यात घेऊन त्याच्या मोटारीतून १०लाख रुपये किमतीची नाणी जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये १,२,५ आणि १० रुपयांच्या नाण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.