कोरोनाची दोन वर्षे जगातील व्यवहार ठप्प राहिले, आता कुठे अर्थव्यवस्था हळूहळू पुर्वपदावर येऊ लागली असतानाच रशिया-युक्रेन युद्धाने तेलाचे भाव वाढले आहेत. त्याचा एकंदरीत परिणाम जगभरातील देशांच्या महागाई दरावर झाला आहे. आता त्याचे थेट परिणाम म्हणून पुढील वर्षी जगभरातील एक तृतीयांश देश हे मंदीच्या सावटाखाली येणार आहेत, अशी शक्यता इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने दिला आहे.
काय म्हणाल्या क्रिस्टालिना जॉर्जीवा?
इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी 2023 मध्ये अनेक देशांमध्ये आर्थिक मंदी येऊ शकते असा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या की, 2023 मध्ये जगभरातील एक तृतीयांश देशाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आपला आर्थिक अंदाज कमी करण्याची तयारीत आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी क्रिस्टालिना जॉर्जीवा म्हणाल्या की, ‘लोकांच्या उत्पन्नात होणारी घट आणि वाढती महागाई याचा अर्थ अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पुढील वर्षी याचे प्रमाण आणखी वाढू शकते. रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली आहे. त्या तुलनेत लोकांचे उत्पन्न वाढले नाही. जगभरातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थेची गती मंदावत आहे. अल्पावधीत परिस्थिती आणखी वाईट आणि बिकट होईल, असेही क्रिस्टालिना जॉर्जीवा म्हणाल्या.
(हेही वाचा जागेवरून लोकलच्या महिला डब्यात राडा, मायलेकिंनी महिला प्रवाशासह पोलिसाला केली मारहाण)
Join Our WhatsApp Community