जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड स्थानकात रखडली, प्रवाशांचा खोळंबा; काय आहे कारण?

154

मनमाड-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसचे कपलिंग बेअरिंग तुटल्याची माहिती समोर येत आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसचे कपलिंग बेअरिंग तुटल्याने गेल्या सव्वा तासापासून जनशताब्दी एक्स्प्रेस ही मनमाड स्थानकात थांबून आहे. मात्र या रखडलेल्या एक्स्प्रेसमुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून त्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडल्याची माहिती मिळत आहे.

काय घडला प्रकार

मनमाड-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसचे कपलिंग बेअरिंग तुटल्याने ही गाडी अर्धी पुढे गेली होती, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मनमाड-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसने दररोज मोठ्या संख्येने प्रवाशी प्रवास करत असतात. परंतु, या एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये झालेल्या खोळंब्यामुळे त्यांच्यात मोठी नाराजी आहे.

(हेही वाचा – शरद पवारांसह त्यांच्या कुटुंबियांविरोधात CBI चौकशीची मागणी; काय आहे कारण?)

जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड स्थानकात आल्यानंतर मनमाड स्टेशनवरून नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना झालेली नाही. मनमाड स्थानकातून गाडी रवाना होणार तेवढ्यात गाडीचे कपलिंग बेअरिंग तुटल्याने या एक्स्प्रेसचे अर्धे डब्बे पुढे गेले आणि अर्धे डब्बे मागेच राहिले. जर या गाडीचा वेग जास्त असता तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.