मुलांच्या उज्वल भविष्यासाठी अहोरात्र झटणा-या आणि आपल्या मुलांना सर्व सुखसोयी उपलब्ध करुन देणा-या आईबाबांना त्यांचीच मुले वृद्धापकाळात मालमत्तेच्या हव्यासापोटी छळतात. असे निरिक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून होत असलेल्या गैरवर्तनाबाबत न्यायालयाने गायिका श्वेता शेट्टी हिच्या केसच्या सुनावणी दरम्यान गंभीर चिंता व्यक्त केली.
काय आहे प्रकरण
मुंबईत राहणा-या महालबा शेट्टी वय वर्ष 95 यांनी आपली मुलगी श्वेता आपला छळ करत असल्याचा आरोप केला आहे. श्वेता शेट्टीवर तिच्या वडिलांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्यानंतर न्यायाधिकरणाने तिला वडिलांचे निवासस्थान सोडण्याचे आदेश दिले होते. जोपर्यंत श्वेताचे वडील जिवंत आहेत, तोपर्यंत ती त्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही. असे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने सांगितले होते.
तोपर्यंत मालमत्तेवर अधिकार नाही
श्वेता तिचा हिस्सा मागत आहे. पण, जोपर्यंत श्वेताचे वडील जीवंत आहेत तोपर्यंत ती त्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही, तसेच त्यांना मालमत्ता दुस-याच्या नावावर करण्यापासून रोखू शकत नाही. हा पूर्णत: त्यांचा निर्णय असेल. वडील जीवंत असेपर्यंत श्वेताचा त्यांच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नसल्याचं न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. मुंबईतील विशेषत: पैसेवाल्या लोकांच्या घरात जेष्ठ नागरिक आणि वृद्ध पालकांना जीवनाच्या शेवटच्या क्षणी मालमत्तेवरुन त्रास सहन करावा लागतो, असं दिसून आल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
( हेही वाचा: हॉटेलच्या जेवणाची थाळी महागणार, कारण काय )
Join Our WhatsApp Community