राज्यात कोरोना आलेख पोहोचला ८ हजारांवर…

82

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. ३१ डिसेंबर रोजी राज्यात एकूण 8 हजार 67 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर एकट्या मुंबईत 5 हजार 428 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव आता दुपटीने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी 5 हजार 300 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज एका दिवसात ही संख्या जवळपास साडे आठ हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 8 हजार 67 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 766 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 66 लाख 78 हजार 821 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 75 हजार 592 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 79 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

(हेही वाचा ओमायक्रॉनचे रुग्ण अधिक, तरी धोका नाही!)

ओमायक्रॉनची रुग्ण संख्या

राज्यात आज ओमायक्रॉनचे 4 नवे रुग्ण आढळून आले, हे रुग्ण वसई-विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 454 वर पोहोचली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती ओमायक्रोन रुग्ण?

  • मुंबई : 327
  • पिपंरी-चिंचवड : 26
  • पुणे ग्रामीण : 18
  • पुणे महापालिका, ठाणे महापालिका : 12
  • नवी मुंबई, पनवेल : प्रत्येकी 8
  • कल्याण, डोंबिवली : 7
  • नागपूर, सातारा : प्रत्येकी 6
  • उस्मानाबाद : 5
  • वसई विरार : 4
  • नांदेड : 3
  • औरंगाबाद, बुलडाणा, भिवंडी, निजामपूर महापालिका, मीरा भाईंदर : प्रत्येकी 2
  • लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर : प्रत्येकी 1
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.