राष्ट्रपतींनी केले सतर्क! म्हणाले, ‘कोरोना संपलेला नाही; दक्ष रहा’

कोरोना साथरोग पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी केले. दिल्लीच्या रोहिणी परसिरातील भगवान महावीर सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.

काय म्हणाले राष्ट्रपती?

यावेळी राष्ट्रपती म्हणाले की, सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, कोविड अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. मी सर्व देशवासियांना आवाहन करतो की, त्यांनी पूर्णपणे सतर्क राहावे आणि सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. जैन धर्माच्या प्रवर्तकांना मास्कची उपयुक्तता शतकापूर्वीच समजली होती, तोंड आणि नाक झाकून ते जिवाणू-हिंसा टाळण्यास सक्षम होते तसेच जिवाणूंचा शरीरात प्रवेश रोखू शकत होते. त्यामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत मिळत असे. जैन परंपरेने पर्यावरणपूरक आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याची शिकवण दिली आहे. सूर्याच्या दैनंदिन संचलनानुसार जीवनशैली अंगीकारणे हा निरोगी राहण्याचा सोपा मार्ग आहे. हाच धडा जैन संतांच्या आदर्श जीवनशैलीकडे पाहून मिळत असल्याचे कोविंद यांनी सांगितले.

(हेही वाचा – बाळासाहेबांनी घडवलेल्या ‘त्या’ इतिहासाची पुनरावृत्ती राज ठाकरे करणार, मनसेचा दावा)

स्वानुभव मांडतांना राष्ट्रपती म्हणाले की, जैन धर्मातील विविध प्रवाहांशी माझा काही विशेष सहवास लाभला आहे आणि मला वेळोवेळी जैन संतांचा विशेष सहवास लाभला आहे, हे मी माझे सौभाग्य समजतो. मला वाटतं की जैन परंपरेत दानधर्माचं महत्त्व आहे, त्यामागे निसर्गाचा नियम आहे, त्यानुसार या जगात आपण जे काही देतो ते आपल्याला निसर्गाकडून अनेक वेळा परत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here