Covid-19: रायगडमध्ये कोरोना रुग्णाचा मृत्यू

राज्य ओमायक्रोनच्या दोन नव्या व्हेरिएंटमुळे चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना आता कोरोनाचाकहर छोट्या शहरांत भयावह ठरू लागला आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या बीए 4 आणि बीए 5 चा फैलाव सुरु असताना आज, सोमवारी रायगडमध्ये एक कोरोनाचा बळी गेला.

पालघर आणि रायगडमध्ये कोरोनाचा प्रसार

मोठ्या शहरानंतर हळूहळू कोरोनाचा मुक्काम गेल्या आठवड्यापासून छोट्या शहरांत दिसून येत होता. मुंबई महानगरातही कोरोनासंख्या वाढत आहे. त्याखालोखाल पालघर आणि रायगडमध्ये कोरोनाचा प्रसार दिसून येत होता. सोमवारी पालघरमध्ये 6 तर रायगडमध्ये 42 नवे रुग्ण सापडले. आता पालघरमध्ये 479 तर रायगडमध्ये 628 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईमहानगर परिसरातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या

  • मुंबई – 11 हजार 331
  • ठाणे -3 हजार 233
  • पालघर – 479
  • रायगड – 628

मुंबईबाहेर जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या

  • पुणे – 1 हजार 208
  • नागपूर – 202

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here