मुंबई विमानतळावरील कोविड चाचण्या नव्हे घोटाळा! काय आहेत अनिवासी भारतीयांचे अनुभव?

110

मुंबई विमानतळावरील कोरोना चाचणी आणि विलिगीकरणात ठेवण्याचा नियम म्हणजेच पैशासाठी करण्यात येणारा घोटाळा आहे, असा आरोप भारतीय वंशाच्या यूकेच्या नागरिकाने फेसबुक लाईव्ह व्हिडिओ करत केला आहे. यूकेचे नागरिक मनोज लाडवा आणि त्याची पत्नी 30 डिसेंबर रोजी कौटुंबिक अंत्यसंस्कारासाठी मुंबईत आले होते.

लंडनमध्ये निगेटिव्ह, मुंबईत पॉझिटिव्ह

Die

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आमच्यासारखेच येथे इतरही लोक आहे. यामुळे मी माझ्या सासऱ्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ शकलो नाही. मी इथे माझ्या सासर्‍यांच्या अंत्यसंस्काराला जाण्याचा प्रयत्न करत आहे. माझी पत्नी शर्मिली, तिच्या वडिलांचे २४ तासांपूर्वी निधन झाले. यामुळेच आम्ही घाईत भारतात आलो आणि हे लोक आमच्याकडून आणखी पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहेत. असा दावा संतप्त यूकेचे नागरिक मनोज लाडवा यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये केला आहे. 3.43 सेकंदाच्या क्लिप दरम्यान चाचणी क्वारंटाईन नियमांबद्दल या व्यक्तीने राग व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : घाटकोपरमध्ये कारखान्यात अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल )

अधिकाऱ्यांकडून धमकी

die people

इथे कोणीही जबाबदार नाही. हा घोटाळा असून आमची फसवणूक होत आहे, अशे लाडवा यांनी स्पष्ट केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी त्यांना धमकी दिली होती की, जर त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, तर क्वारंटाईन सेंटरमध्ये रवाना करून त्यांच्यावर शुल्क आकारले जाईल, असाही आरोप लाडवा यांनी केला आहे.  सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि पालिकेच्या कारभारावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.