एकाच दिवसात राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा विक्रम

91

राज्यात एकाच दिवसात मुंबई व महानगर परिसरात तसेच पुण्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. परिणामी एकाच दिवसात राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या आता ४ हजार २४ पर्यंत आढळली. मात्र गेल्या २४ तासांत ३ हजार २८ कोरोनाच्या रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर घरी सोडल्यावर राज्याची सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या वीस हजारांच्यावर गेली नाही. सध्या राज्यात १९ हजार २६१ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत. बुधवारी, १५ जून रोजी राज्यात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबई आणि ठाण्यात कोरोना रुग्णांना वाचवण्यात यंत्रणेला अपयश आले.

(हेही वाचा राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचा नकार, तरी उमेदवार देणारच – ममता बॅनर्जी)

१५ जून रोजी आढळून आलेले रुग्ण 

जिल्हा – रुग्णसंख्या

  • मुंबई – २ हजार २९३
  • ठाणे – ५८
  • ठाणे मनपा – ३४०
  • कल्याण-डोंबिवली – ८३
  • मीरा भाईंदर – १०२
  • वसई-विरार – १०३
  • रायगड – ९३
  • पनवेल – १११
  • पुणे – ५३
  • पुणे मनपा – २०६
  • पिंपरी-चिंचवड – ६०
  • नागपूर – २७
  • नागपूर शहर – २३
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.