कोविड टेंडर घोटाळा प्रकरणी अदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना आज (सोमवार २६ जून) ईडी कार्यालयात बोलविण्यात आले आहे. चव्हाण यांच्याकडे घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यात येणार असून कोविड काळात त्यांनी घेतलेल्या घराबाबत तसेच त्यांचे कंत्राटदार यांच्यासोबत असलेल्या संबंधांविषयी चौकशी करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुरज चव्हाण यांनी कोविड काळात १० कोटी रुपयांचे चार फ्लॅट विकत घेतल्याचे ईडीच्या कारवाईतून समोर आले. तसेच सूरज चव्हाण हे कोविड काळात कंत्राटदार आणि मनपा अधिकारी यांच्यात मध्यस्थीचे काम करत असल्याचे देखील ईडीच्या तपासातून समोर आले आहे. याच संदर्भात चौकशी करण्यासाठी ईडीने सूरज चव्हाण यांना गेल्या आठवड्यात समन्स बजावून त्यांना आज म्हणजेच सोमवारी (२६ जून) चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा – ‘उध्दव ठाकरेंच्या १५ वर्षाच्या कालावधीत मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात भ्रष्ट महापालिका’ – श्रीकांत शिंदे यांचे टीकास्त्र)
सूरज चव्हाण यांचा कोविड काळात झालेल्या घोटाळ्यात थेट संबंध असल्याचा संशय ईडीच्या अधिकाराऱ्यांना आहे. अशातच सूरज चव्हाण यांनी शहरात घेतलेली महागडी घरे देखील ईडीच्या रडारवर आले आहे.
चव्हाण यांच्या चौकशीदरम्यान ईडीकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांपैकी, शहरातील महागड्या घरांचा प्रश्न प्रामुख्याने विचारला जाणार असल्याचे समजते आहे. तसेच त्यांची बँक खाती, आणि इतर आर्थिक मिळकतीबाबत देखील चौकशी केली जाणार असून त्यांचे मनपा अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याशी असलेल्या सबंधा बाबत प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community