मलबार टेकडीच्या उतारावरून पावसाळ्यादरम्यान माती आणि दगड आदींची मोठ्याप्रमाणात घसरण झाल्यामुळे बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या लाद्यांना काही ठिकाणी तडे गेले आहेत. या मंदिराच्या पायऱ्यांना ठिकठिकाणी पडलेल्या भेगा मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे येथील दगडी भिंत कलती झालेली दिसत आहे. या जागेखालून पाणी पुरवठा करणाऱ्या ११ जलवाहिन्या जात असून यांना यापासून धोका निर्माण झाला आहे. दरम्यान या मलबार टेकडीचा भाग कोसळून भविष्यात होणारी संभाव्य दुघर्टना टाळण्यासाठी आता महापालिकेच्यावतीने त्याठिकाणी आता संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.
( हेही वाचा : विद्यार्थिनीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक )
मलबार टेकडी येथील पुरातन बाबुलनाथ मंदिर तसेच करवा चौथ पॉईंट याठिकाणी मोठ्याप्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मात्र, याठिकाणी पर्यटक तसेच भाविक गदी करत असले तरी टेकडीच्या उतारावरून पावसाळ्यादरम्यान माती व दगडाची घसरण होऊ लागली आहे. या टेकडीच्या भाग खचू लागल्याने येथील संरक्षक भिंत झुकल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे काही याला काही ठिकाणी तडे गेले असून काही ठिकाणी ही भिंतही पडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाबुलनाथ मंदिर ते करवा चौथ येथील काही भागाची टप्प्यासहित संरक्षक भिंत बांधून पायऱ्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंत्राटदाराच्या निवडीसाठी निविदाही काढण्यात आल्याचे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.
खचलेल्या टेकडीच्या जागेखालून ३०० मी.मी. ते १२०० मी.मी व्यासाच्या मोठमोठ्या ११ जलवाहिन्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात जर टेकडीचा भाग खचून कोणत्याही प्रकारची दुघर्टना घडल्यास तर या जलवाहिन्या फुटू शकतात. परिणामी यामुळे पाणीपुरवठा खंडित होऊ होऊ शकतो. तसेच बऱ्याच प्रमाणात जिवित अथवा वित्तहानी होण्याची दाट शक्यता असल्याने याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या टेकडीच्या खचत असलेल्या जागेवर संरक्षक भिंत उभारण्यासाठी सी.आर.शहा या कंपनीची निवड करण्यात आली असून याकरता सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
मुंबईत यापूर्वी म्हणजे ५ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाबुलनाथ जंक्शन जवळ असणाऱ्या एन. एस. पाटकर मार्गाला लागून असणारा टेकडीच्या उताराचा भाग ढासळला होता. यामुळे टेकडीच्या वरुन जाणारा बी. जी. खेर मार्गही प्रभावीत होऊन धोकादायक झाल्याने. या बाधित भागाचे बळकटीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारली. तसेच रस्त्याखाली पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी जलवाहिनी बांधण्यासह रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे प्रत्यक्ष काम नियोजित वेळेपेक्षा ६ महिने आधीच पूर्ण केले होते. याअंतर्गत ५मीटर उंचीची व १६० मीटर लांब संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. त्यानंतर आता बाबुलनाथ मंदिर ते करवाँ चौथ पॉईंट पर्यंत अशाप्रकारची संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community