पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, “सायबर सुरक्षित भारत”ची (Cyber Safe India) निर्मिती करणे हे गृह मंत्रालयाच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालय सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी (Cyber Safe India) आणि लोकांना सायबर धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेले दूरध्वनी क्रमांक आणि समाजमाध्यम हँडल यांची माहिती एनसीआरपी www.cybercrime.gov.in कडे त्वरित कळवावी.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : तुम्हाला नाक खाजवायलाही मॅडमची परवानगी लागते)
देशातील सायबर गुन्ह्यांना समन्वित आणि सर्वसमावेशक पद्धतीने चाप लावण्यासाठी (Cyber Safe India) भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4सी ) हा केंद्रीय गृहमंत्रालयाचा एक उपक्रम आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या I4 सी सह राष्ट्रीय सायबर गुन्हे धोके विश्लेषण युनिटने (एनसीटीएयु ) गेल्या आठवड्यात संघटित गुंतवणूक/कार्य आधारित – अर्धवेळ नोकरी देण्याचे आश्वासन देत फसवणूक करणारी 100 हून अधिक संकेतस्थळे ओळखली असून त्यांना ब्लॉक करण्याची शिफारस केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, ही संकेतस्थळे ब्लॉक केली आहेत. बेकायदेशीर गुंतवणुकीशी संबंधित आर्थिक गुन्ह्यांवर आधारित/संघटित कृती करणारी ही संकेतस्थळे परदेशातून चालवली जातात आणि हे करण्यासाठी डिजिटल जाहिराती, चॅट मेसेंजर आणि बनावट /दुसरी खाती वापरत असल्याचे समजले. कार्ड नेटवर्क, क्रिप्टो चलन , परदेशी एटीएममधून पैसे काढणे आणि आंतरराष्ट्रीय फिनटेक कंपन्यांचा वापर करून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणुकीतून मिळालेली रक्कम अनधिकृतपणे भारताबाहेर पाठवली जात असल्याचेही दिसून आले आहे. (Cyber Safe India)
या संदर्भात 1930 हा हेल्पलाईन क्रमांक आणि एनसीआरपी यांच्या माध्यमातून अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत आणि असे गुन्हे नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण करत आहेत आणि त्याचबरोबर यामुळे माहितीच्या सुरक्षिततेविषयी चिंताजनक स्थिती निर्माण होत आहे. (Cyber Safe India)
सावधगिरीच्या उपाययोजना म्हणून खालील मार्गांचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात येतो –
१. इंटरनेटवर प्रायोजित करण्यात येणाऱ्या आणि फार मोठ्या प्रमाणात कमिशन देणाऱ्या अशा कोणत्याही ऑनलाईन योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दल सखोल माहिती गोळा करा.
२. एखाद्या अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअप किंवा टेलीग्राम यांच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधला तर व्यवस्थित पडताळणी करून घेतल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका.
(हेही वाचा – Shubman Meets Rashid Khan : शुभमन गिल आणि राशिद खान यांची लंडनमध्ये गळाभेट)
३. युपीआय अॅप मध्ये रक्कम स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे जे नाव दिसते आहे त्याची पडताळणी करा. जर अशी व्यक्ती संशयास्पदरित्या भासत असेल तर ते खाते घोटाळेबाज असू शकते आणि ती योजना फसवी असू शकेल. तसेच सुरुवातीला ज्या स्त्रोताकडून कमिशनची रक्कम अदा केली आहे त्या स्त्रोताची देखील तपासणी करा. (Cyber Safe India)
४. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी खात्यांशी आर्थिक व्यवहार करणे टाळावे. कारण अशी खाती खंडणीसारख्या व्यवहारांमध्ये आणि अगदी दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यामध्ये देखील सहभागी असू शकतात. तसेच अशी खाती पोलिसांतर्फे गोठवली जाण्याची तसेच या खात्यांवर इतर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता असते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community