आर्थर रोड तुरुंग आता व्हीआयपी, व्हीव्हीआयपी कैद्यांसाठी विशेष बनत चालले आहे. कारण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ माजी मंत्री नवाब मलिक यांची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली, आता शिवसेना नेते संजय राऊत यांनाही याच तुरुंगात ठेवले आहे. आता तुरुंग प्रशासन व्हीआयपीसाठी ९ विशेष बॅरेक बनवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आणखी उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. अजून कोणत्या नेत्यांची रवानगी आर्थर रोडमध्ये होणार आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
निमित्त संजय राऊत ठरले का?
राज्यात जेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत, तेव्हापासून आयकर विभाग, ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांनी राजकीय नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरु केला आहे. त्यानुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली, त्यांची रवानगी आर्थर रोडमध्ये जेलमध्ये केली. त्यानंतर नवाब मलिक यांना अटक करून त्यांनाही याच कारागृहात पाठवले. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनाही अटक करण्यात आली असून त्यांनाही याच कारागृहात ठेवण्यात आले आहेत. यासंबंधी मात्र कारागृह अधिकाऱ्यांनी यामागे विशेष कोणतेही कारण नाही. कारागृहातील ९ बॅरेकमध्ये केवळ इंग्रजी शौचालय बसवण्यात येणार आहे, याव्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त सुविधा पुरवण्यात येत नाही. कारण आर्थर रोड तुरुंगात बाहेरील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ठेवले जाते, तसेच काही राजकीय नेत्यांनाही ठेवण्यात आले आहे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून केवळ इंग्लिश टॉयलेट बसवण्यात येत आहेत. खरे तर २०१९ लाच असे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार सप्टेंबर २०२० ला काम सुरु झाले आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी त्यांना भारतीय पद्धतीच्या शौचालयात बसता येत नाही, असे म्हटले होते, त्यावरून वादही झाला होता, त्यामुळे आता इंग्लिश टॉयलेट बसवण्यात येत आहे. हीच वस्तुस्थिती आहे.
Join Our WhatsApp Community