Credit Card आणि UPI ने पेमेंट करताय? आता होणार हा’ फायदा

176

Credit Cardचा वापर बदलत्या काळासोबत वाढत आहे. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्याने खूप सवलती मिळतात. तसेच, क्रेडिट कार्डच्या वापरामुळे खूप रिवाॅर्डसही मिळतात. या रिवाॅर्ड्समुळेही खूप फायदा होतो. या रिवाॅर्ड्समध्ये कॅशबॅक, सवलती आदींचा समावेश असतो. तसेच, अनेकजण युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणे पसंत करतात. मात्र, आता क्रेडिट कार्ड आणि यूपीआय दोन्हीमधून युझर्सना फायदा होणार आहे.

क्रेडिट कार्डधारक लवकरच युनायटेड पेमेंट इंटरफेसच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांचा भरणा करण्यास सक्षम असतील. सध्या यूपीआयचा वापर करणा-यांना केवळ त्यांच्या बॅंक खात्याच्या माध्यमातूनच व्यवहार करण्याची परवानगी होती. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट केवळ Razorpay Payments Gateway चा वापर करणा-या व्यापा-यांनाच करता येईल. त्यामुळे त्यांचा प्लॅटफाॅर्म यूपीआयवर क्रेडिट कार्ड व्यवहरांना सक्षम करेल. Razorpay ने सांगितले की, हा एनसीपीआय सुविधेचा अवलंब करणारा पेमेंट गेटवे आहे. जो ग्राहकांना त्यांच्या रुपे क्रेडिट कार्डला यूपीआयसोबत परवानगी देतो. Razorpay ने सांगितले की, एनसीपीआय आणि आरबीआयच्या डिजिटल स्पेसमध्ये नाविन्यपूर्ण इनोव्हेशनला अनुरुप अशी ही सुविधा आहे.

( हेही वाचा: ऑनलाईन व्यवहार करताय? UPI पेमेंटसाठी आता Paytm, GPay, PhonePe वर मर्यादा; किती असणार लिमिट? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.