एका व्हिडीओ कॉलमुळे ७५ वर्षीय आजोबांचे बँक खाते रिकामे

७५ वर्षीय आजोबांची एका व्हिडीओ कॉलमुळे साडेतीन लाखांची फसवणूक झाल्याची घटना घाटकोपर येथे घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा, खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी MSRDC उभारणार १५ पोलीस ठाणी)

अज्ञात क्रमांकावरून व्हिडिओ कॉल 

पूर्व उपनगरातील घाटकोपर पश्चिम परिसरात हे ७५ वर्षीय आजोबा आपल्या पत्नीसोबत राहतात. मंगळवारी त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअॅपवर अनोळखी क्रमांकावरून एक मेसेज आला, त्यात ‘आय एम फ्रॉम जयपूर’ एवढेच लिहण्यात आले होते, काही वेळाने त्याच क्रमांकावरून एक व्हिडिओ कॉल आला असता त्यांनी तो कॉल रिसिव्ह केला असता त्यात एक तरुणी नको त्या अवस्थेत अश्लील हावभाव करीत होती. यावर त्यांनी तात्काळ व्हिडीओ कॉल बंद केला.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

काही वेळाने दुसऱ्या एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना कॉल आला व समोरच्या व्यक्तीने तो दिल्ली पोलिसातून बोलत असल्याचे सांगून तुमच्या विरुद्ध एका तरुणीने तक्रार दाखल केल्याची धमकी देऊन त्यांना एक व्हिडिओ पाठवून पैशाची मागणी करण्यात आली, त्यांनी त्याची मागणी पूर्ण केली परंतु हळूहळू त्यांची मागणी वाढू लागली आणि साडे तीन लाख ७५ वर्षीय आजोबांकडून उकळण्यात आले. याबाबत घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here